Maharashtra Politics : ठाकरे गटातील नेत्यांवर अटकेची टांगती तलवार; नेमकं काय आहे प्रकरण?

ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख, माजी सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य व अन्य एक पदाधिकारी अडचणीत
Uddhav thackeray
Uddhav thackeray saam tv
Published On

जितेश कोळी

Maharashtra Politics Latest News : रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी येथील एका बंद पडलेल्या कंपनीतील कोट्यवधी रुपयांच्या भंगार चोरी प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या ठाकरे गटातील नेत्यांवर आता अटकेची टांगती तलवार असल्याची माहिती पुढे आली आहे.

Uddhav thackeray
Pune By Election 2023: कसबा निवडणूक मनसे लढवणार नाही; स्थानिक पदाधिकारी आग्रही असतानाही माघार

ठाकरे गटाचे खेड तालुकाप्रमुख आणि लोटे गावचे सरपंच चंद्रकांत चाळके, माजी पंचायत समिती सभापती जीवन आंब्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू आंब्रे व अंकुश काते या चौघा संशयितांनी भंगार चोरी प्रकरणात खेड पोलीस (police) स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर खेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता.

परंतु न्यायालयाने हा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळल्याने या चारही नेत्यांना पोलिसांकडून आता अटक केली जाण्याची शक्यता आहे. सध्या खेड पोलीस या चारही संशयित आरोपी असलेल्या नेत्यांचा शोध घेत आहेत.

Uddhav thackeray
Kolhapur Crime : पती नव्हे हा तर हैवान! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसोबत केलं भयंकर कृत्य; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

लोटे एमआयडीसी येथील बंद पडलेल्या मिसाळ कंपनीतील कोट्यवधी रुपयांच्या भंगाराची चोरी झाल्याचा प्रकार साधारण दोन महिन्यांपूर्वी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत उघडकीस आणला होता.

या प्रकरणात एका स्थानिक युवकाने पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांच्या तपासात ठाकरे गटातील चार नेत्यांना या प्रकरणात संशयित आरोपी करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com