Pankaja mUnde Saam TV
महाराष्ट्र

Pankaja Munde : मी संघर्ष कन्या, मी कुणासमोर झुकणार नाही; पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे?

दसऱ्याच्या मुहूर्तावर बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यात बोलत होत्या.

साम टिव्ही ब्युरो

बीड : मी संघर्ष कन्या आहे, माझा संघर्षाचा वारसा आहे, मी संघर्ष करणार. जोडे उचलणाऱ्यांचं कधीच इतिहासात नाव झालं आहे. त्यामुळे संघर्ष हा प्रत्येकाला आहे. गोपीनाथ मुंडेंची मी लेक आहे. त्यामुळे संघर्ष मला नवीन नाही. संघर्ष मी नाकारणार नाही. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपल्या भाषणात संघर्षाचा उल्लेख केला मात्र त्यांचा रोख कुणावर? हा प्रश्न अता उपस्थित होत आहे.

मुंडे साहेबांना देखील संघर्ष चुकला नाही. ज्या पक्षात कुणीही जात नव्हतं त्या पक्षाचं कमळ घेऊन त्यांनी पक्ष वाढवला. 40 वर्षांच्या आयुष्यात केवळ त्यांना साडेचार वर्षांचीच सत्ता मिळाली, याची आठवण पंकजा मुंडे यांनी करुन दिली.

दसऱ्याच्या मुहूर्तावर बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यात बोलत होत्या. खासदार प्रीतम मुंडे यांनी रॅलीला सुरुवात केली आहे. बीडच्या परळी येथील गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन गोपीनाथगड ते भगवानभक्ती रॅलीला सुरुवात केली.

मी कुणावरही नाराज नाही

व्यक्ती श्रेष्ठ नाही, संघटन श्रेष्ठ आहे. मी हा नियम पाळते. पक्षातील सर्वांना हा नियम लागू आहे. मीडियाला मी हात जोडून विनंती करते पंकजा मुंडे नाराजीची बातमी करु नका. मी आता 2024 च्या तयारीला लागली आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

मेळावा म्हटलं की टीका होते, चिखलफेक होते. पण आमचा हा मेळावा चिखलफेक करणाऱ्यांचा नाही, चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मी कधीच कोणाविषयी वाईट किवा खालच्या पातळीवरचे भाष्य केले नाही, ते आमच्या रक्तातच नाही.

मी पदर पसरून कुणाकडे काही मागायला जाणार नाही. 2024 च्या तयारीला लागा. मोठ्या प्रमाणावर काम करु आणि स्वाभीमानाने आपलं राज्य तयार करु. त्यामुळे आपआपल्या भागात जाऊन कामाला लागा, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

SCROLL FOR NEXT