संजय महाजन, साम टिव्ही
जळगाव : भाजपचे आमदार संजय कुटे यांचं जळगाव जामोद येथील निवासस्थान पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. अतिवृष्टीमुळं शेतीचं नुकसान झालं होतं. त्याचा मोबदला न मिळाल्यानं शेतकरी संतापला आणि त्यानं पेट्रोलची कॅन घेऊन आमदाराच्या बंगल्यात प्रवेश केला. कुटेंच्या स्वीय सहायकानं वेळीच रोखल्यानं पुढील अनर्थ टळला. या घटेनवर भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. 'नुकसान भरपाईचे पैसे मिळतील, पण आमदाराचे घर जाळावं, त्यांच्या घरावर पेट्रोल टाकावं, असं कोणी करू नये,' असं महाजनांनी जनतेला आवाहन केलंय.
सरकार शेतकऱ्यांच्यासोबतच आहे. जेवढा निधी देवेंद्रजींच्या सरकारमध्ये मिळालेला आहे. शेतकऱ्यांना एवढा निधी आतापर्यंत कधीही मिळालेला नाही. नुकसान झालं असेल त्या शेतकऱ्यांसोबत आम्ही आहोत त्यांचे पैसे आम्ही तात्काळ देऊ, असं अश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलंय.
लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळतील?
दरम्यान, लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळण्याबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की, '१५०० रुपये आपण लाडक्या बहिणीला देत आहोत, यापूर्वी तर कोणी देत नव्हतं. ठीक आहे निवडणुकीच्या काळात आम्ही सांगितलेलं होतं की २१०० रुपये आम्ही लाडक्या बहिणीला देऊ निश्चितच...मात्र एक वर्ष सुद्धा अजून आम्हाला झालेलं नाही, सहा-सात महिने झाले आहेत. सरकारची थोडी आर्थिक अडचण आहे आपल्यालाही माहिती आहे. लाडक्या बहिणींना १५०० रुपये मिळत आहेत, लाडक्या बहिणी आता खुश आहेत. विरोधकांना फक्त तेवढाच शब्द आठवतो. मात्र त्यांनी त्यांच्या काळात काय दिलं काय केलं ते नाही आठवत...म्हणूनच लोकांचा त्यांच्यावर आता विश्वास नाही विरोधकांवर अजिबात विश्वास राहिलेला नाही', असं गिरीश महाजन यावेळी म्हटले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.