Girish Mahajan
Girish Mahajan saam tv
महाराष्ट्र

शिंदे सरकारच्या खातेवाटपानंतर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंडाळीनंतर मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. शिंदे गटामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलले आहे. शिंदे गटाच्या बंडाळीनंतर तब्बल ३८ दिवसांपेक्षा अधिक दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. त्यानंतर आता साऱ्या जनतेचे लक्ष शिंदे सरकारमध्ये कोणाला कुठलं खातं मिळेल, याकडे लागले होते. जनतेचे लक्ष लागलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले. शिंदे सरकारच्या खातेवाटपानंतर भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Girish Mahajan News)

शिंदे सरकारच्या खातेवाटपानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी खातेवाटपावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

गिरीश महाजन म्हणाले, ' जे खाते मिळाले, त्यामध्ये समाधानी आहे. पक्ष जी जबाबदारी देईल, ती समर्थपणे सांभाळली पाहिजे. आपण काम कसे करतो, याला महत्व असते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जी जबाबदारी देईल, ती समर्थपणे सांभाळणार आहे. मला ग्रामविकास खाते देखील मिळाले आहे. मी ग्रामीण भागातून निवडून येतो. बंजारा समाज, आदिवासी, वंजारी यांच्याशी जवळचा संबंध आहे. वैद्यकीय शिक्षणही खाते देखील माझ्याकडे आहे. मागेही सर्वत्र चांगले उपक्रम हाती घेतले होते. सर्वसामान्यांशी निगडित खाते असल्याने मला या खात्यात रस आहे'.

'क्रीडा खाते देखील माझ्याकडे आहे. मी स्वत: खेळाडू आहे. अनेक खेळ खेळलो आहे. खेळामध्ये अष्टपैलू होतो. युवक खेळाकडे वळला तर व्यसनापासून दूर राहील. क्रीडा विभागात बोगस सर्टिफिकेट आणि इतर प्रकार उघडकीस आले होते. त्याबाबत चौकश्या सुरू आहेत. मी कार्यभार हाती घेतल्यावर या प्रकरणात लक्ष घालेन', असे महाजन पुढे म्हणाले.

महाजन पुढे म्हणाले, 'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे चांगले खाते ठेवले असे विरोधी पक्षाला काहीतरी बोलायचे म्हणून म्हणत आहेत. केवळ २० मंत्र्यांवर सरकार चालेल असं शक्य नाही. बाकी मंत्रिमंडळ विस्ताराला अधिक वेळ लागणार नाही. काही अडचणी नाही, सर्व तांत्रिक अडथळे दूर झाले आहेत. लवकरच ४०-४२ मंत्री कारभार हाती घेतील '. तर प्रदेशाध्यक्ष पद मिळाले नाही म्हणून नाराज आहेत का ? यावर भाष्य करताना महाजन म्हणाले, 'माझ्या चेहऱ्यावर नाराजी दिसते आहे का ? असे काहीही नाही'.

दरम्यान, गिरीश महाजन यांनी पालकमंत्रिपदावर देखील भाष्य केले. महाजन म्हणाले, 'पालकमंत्री अजून ठरले नाहीत. त्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील'. तसेच त्यांनी खातेवाटपाबाबत कोणी मंत्री नाराज असल्याचेही सांगितले'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loksabha Election: नगरमध्ये महाविकास आघाडीत फूट! ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा सुजय विखेंना पाठिंबा; निलेश लंकेंना बालेकिल्ल्यात धक्का

Maharashtra Weather Forecast: पुणे, ठाणे आणि रायगडसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळीची शक्यता

Delhi School Bomb Threat: शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी प्रकरण, दिल्ली सरकारने शिक्षकांना दिल्या 'या' महत्वाच्या सूचना

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकची कंटेनरला धडक; १ ठार २ जखमी, वाशिममधील घटना

Abhijit Patil Supports BJP: महाविकास आघाडीला मोठा धक्का! सोलापुरात बड्या नेत्याचा भाजपला पाठिंबा

SCROLL FOR NEXT