Video| शिंदे सरकारच्या खातेवाटपानंतर मंत्री दीपक केसरकर नाराज; म्हणाले, 'पर्यटन खाते...'

शिंदे सरकारच्या खातेवाटपानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर (Deepak Kesarkar) नाराज झाले आहेत. खातेवाटपानंतर केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Deepak Kesarkar
Deepak Kesarkarsaam tv

विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंडाळीनंतर मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. शिंदे गटामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलले आहे. शिंदे गटाच्या बंडाळीनंतर तब्बल ३८ दिवसांपेक्षा अधिक दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. त्यानंतर आता साऱ्या जनतेचे लक्ष शिंदे सरकारमध्ये कोणाला कुठलं खातं मिळेल, याकडे लागले होते. जनतेचे लक्ष लागलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले. शिंदे सरकारच्या खातेवाटपानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर (Deepak Kesarkar) नाराज झाले आहेत. खातेवाटपानंतर केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Deepak Kesarkar News)

Deepak Kesarkar
खातेवाटपानंतर शिंदे सरकारमधील मंत्री उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

शिंदे गटाच्या बंडाळीनंतर राज्यातील राजकारण बदलून गेलं आहे. बंडाळीनंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दोघांनी शपथ घेतल्यानंतर राज्यात दोघेच सरकार चालवत होते. त्यामुळे विरोधकांकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीनंतर एक महिन्यापेक्षा अधिक अवधी उलटल्यानंतर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर रविवारी आज, शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर खातेवाटप केले आहे. या खातेवाटपावर शिदे गटाच्या मंत्र्यांची नाराजी उघड होताना दिसत आहे.

शिंदे सरकारच्या खातेवाटपानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. केसरकर म्हणाले, शालेय शिक्षण विभागाचा कोकणाला फारसा उपयोग होणार नाही. पर्यटन खाते हे सिंधुदुर्गच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे खातं होतं ते कोणाकडे गेलं हे मला माहीत नाही.मात्र , मला जे खातं मिळालं त्याची मला विशेष माहिती नाही. परंतु अधिकाऱ्यांकडून योग्य ती माहीती घेऊन काम करणार आहे'.

Deepak Kesarkar
...म्हणून देवेंद्र फडणवीस राज्याचे पॉवरफुल उपमुख्यमंत्री ठरणार; कारण ?

दरम्यान, आज खातेवाटप झाल्यानंतर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्याकडे उद्योग खात्याचा पदभार सोपविण्यात आला आहे. शिंदे सरकारच्या खातेवाटपानंतर शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री उदय सांमत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंत म्हणाले,' राज्यातील बेराजगारी मोठा प्रश्न असून जास्तीत जास्त प्रकल्प राज्यात आणून ती दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसंच महाराष्ट्र उद्योगिक क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आणणार असून कोकणातील रिफायनरीबाबत असणारे गैरसमज दूर करायला हवेत'.

'रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगारी संपविण्याचा प्रयत्न करणार असून बेराजगारी दूर करणारा प्रत्येक प्रकल्प राज्यात आणणार आहे. तर येत्या सहा महिन्यात एखादा तरी प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यासाठी आणणार आहे, असेही उदय सामंत म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com