Meeting Of BJP Saam TV
महाराष्ट्र

Meeting Of BJP: मुंबईत भाजपची महत्वाची बैठक; भाकरी फिरण्याची शक्यता

Political News: या बैठकीत भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार देखील उपस्थित राहणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Important Meeting Of BJP: लवकरच लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. अशात तीन दिवसांपूर्वी भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत पुण्यात कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यानंतर आता मुंबईत देखील भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्षात काही बदल होण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडत आहे. या बैठकीत काही संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीत भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार देखील उपस्थित राहणार आहेत.

मिशन दिडशे

येत्या महापालिका नुवडणुकीसाठी भाजपने आपलं टार्गेट निश्चित केलं आहे. यावेळी गाठायचा आकडा दिडशे ठरवण्यात आला आहे. मिशन दिडशे पूर्ण करण्यासाठी पक्षात बऱ्याच हालचालींना वेग आला आहे.

मिशन गाठण्यासाठी सर्वच कार्यकर्ते कामाला लागल्याचेही दिसत आहे. दिडशे जागा जिंकून सत्ता मिळवण्यासाठी भाजपचं बूथ लेव्हलचं काम सुरु झालं आहे. तसेच आता होणाऱ्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगावमध्ये पुरवठा विभागाची कारवाई; हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा वापर, दोन सिलेंडर जप्त

Tuesday Horoscope: जोडीदारासोबत छान वेळ घालवता येणार, पैसा कमी खर्च होईल; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics: राज्यसभेच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसनं टाकला डाव; भाजपच्या अनेक नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

विधानसभेत मोठा राडा! शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप; आव्हाडांकडून दिलगिरी, निलंबनाची मागणी; नेमकं काय घडलं? VIDEO

Iran-US War: खामेनेईंच्या मृत्यूनंतरही ट्रम्प इराणमधील राजवट का बदलू शकले नाहीत? सत्तांतर का झालं नाही? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT