chhagan bhujbal saam tv
महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणाचा राज्यात नव्हे तर देशात भाजपने खून केला- छगन भुजबळ

राज्यात सध्या ओबीसी आरक्षणावरुन (OBC Reservation) वातावरण तापले आहे.

साम टिव्ही ब्युरो

तरबेज शेख

नाशिक: राज्यात सध्या ओबीसी आरक्षणावरुन (OBC Reservation) वातावरण तापले आहे. सुप्रीम कोर्टाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची याचिका फेटाळल्यानंतर राज्य सरकार (State Government) अडचणीत आले आहे. यावर आता मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली आहे. ओबीसी आरक्षणाचा राज्यात नव्हे तर देशात भाजप सरकारने खून केला आहे. 2010 मध्ये कृष्णमूर्ती अहवालानंतर जनगणना करा असे आम्ही सांगितले होते. 2016 मध्ये जनगणना संपल्यापासून हा रिपोर्ट त्यांच्याकडे आहे. देशात आणि राज्यात भाजप सरकार होते, फडणवीसांनी तेव्हा काही केले नाही. दोन वर्ष आम्ही आणि तुम्ही सगळे जण मुखपट्टी लावून घरी बसलो होतो.

तुमच्यामुळे महाराष्ट्रच नाही तर मध्यप्रदेशसह सर्व राज्य अडचणीत आली अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. ट्रिपल टेस्ट पूर्ण होत नाही हे पाहून त्यांनी डेटा मागितला, आमचे काम रात्रदिवस सुरू आहे प्रत्येक कायदा करत असतांना फडणवीसांच सहकार्य मागीतले घरी गेलो. तुम्ही माजी मुख्यमंत्री आहात पण आम्ही प्रामाणिक पणे काम करत आहोत आम्हाला सांगा काय करायचे ते सुचवा, प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नका अशी विनंती भुजबळांनी केली आहे.

यावेळी भुजबळांनी राज ठाकरे आणि आदित्या ठाकरे यांच्या अयोद्धा दौऱ्यावर भाष्य केले आहे. निवडणुका आल्या म्हणजे दौरे होणार, पक्ष आपला अजेंडा राबविणार, कोणी भोंगा वाजवणार तर कोणी ईतर काही करणार. एवढेच आहे की समाजामध्ये दंगे घडवू नका. तुम्ही येणार तेव्हा भोंगा, माईक असणारच आहे. फक्त त्यातून महागाईवरही वाचा फोडा असे म्हणत छगन भुजबळांनी राज ठाकरेंवरती नाव न घेता टीका केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

Beetroot Benefits: हिवाळ्यात बीट खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Constitution Day : संविधान वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक; संविधान दिनी PM मोदींचा दहशतवाद्यांनाही कडक इशारा

Health Tips: हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्याने मिळतात जबरदस्त फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला? भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर

SCROLL FOR NEXT