Uddhav Thackeray MP claims Sanjay Deshmukh SaamTv
महाराष्ट्र

ठाकरेंचे खासदार फोडणार? खासदारांना पैशांचं आमिष? ठाकरेंच्या खासदाराच्या दाव्याने खळबळ

Uddhav Thackeray MP join BJP? : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गटाच्या प्रतापराव जाधवांच्या घरी ठाकरेंच्या खासदारांनी स्नेहभोजन केलं. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार फुटण्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

Prashant Patil

भरत मोहळकर, साम टीव्ही

मुंबई : ठाकरे गट फोडण्यासाठी पुन्हा राज्यात हालचाली सुरू झाल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाच्याच खासदारानं केलाय. पैशांचं आमिष दाखवलं जात असल्याचं या खासदाराचं म्हणणं आहे. ठाकरे गटावर कोणत्या पक्षाची नजर आहे? लोकसभेत बहुमातासाठी भाजपची काय रणनीती आहे? यावरचा हा विशेष रिपोर्ट.

राज्यात पुन्हा एकदा फोडाफोडीच्या चर्चांना उधाण आलंय. ठाकरे गट खिळखिळा करण्यासाठी भाजपकडून ठाकरेंच्या खासदारांना गळाला लावण्यासाठी पैशाचं आमिष दाखवून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा दावा खासदार संजय देशमुखांनी केलाय. तर दुसरीकडे भाजप कधीच फोडाफोडीचं राजकारण करत नसल्याचा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गटाच्या प्रतापराव जाधवांच्या घरी ठाकरेंच्या खासदारांनी स्नेहभोजन केलं. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार फुटण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता भाजपलाही केद्रात इतर पक्षांच्या खासदारांना गळाला लावण्याची आवश्यकता का वाटते? पाहूयात.

केंद्र सरकार नितीश कुमार आणि चंद्रबाबूंच्या टेकूवर उभं

एकनाथ शिंदेंकडेही ७ खासदारांचं संख्याबळ, त्यामुळे शिंदेंकडून दबावाचं राजकारण

ठाकरे गटाकडे ८ खासदारांचं संख्याबळ

ठाकरेंचे खासदार गळाला लागल्यास शिंदेंची बार्गेनिंग पॉवर आणखी कमी होण्याची शक्यता

नितीश कुमारांनी बिहार निवडणुकीपूर्वी मणिपूर सरकारचा काढलेला पाठिंबा आणि शिंदेंकडून सुरु असलेलं दबावाचं राजकारण पाहता सरकार स्थिर करण्यासाठी भाजप खासदारांची जुळवा-जुळव करत असल्याची चर्चा आहे. मात्र ठाकरेंचे खासदार शिंदे गटाकडे जाणार, भाजपच्या गळाला लागणार की शिवबंधन बांधताना घेतलेलं वचन जपणार? हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gavran Pithla Bhakri: गावरान पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल पिठलं, ज्वारीच्या भाकरीसोबत आखा जेवणाचा बेत

Maharashtra Live News Update : : सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय तोडफोड प्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांची निर्दोष मुक्तता

Govt Hospital Scandal: चादर अंगावर ओढली; हॉस्पिटलच्या वेटिंग एरियातच जोडप्याने ठेवले शरीरसंबंध; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संतापले

Aloo Lachcha Recipe: संध्याकाळचा नाश्त्याला बनवा क्रिस्पी अन् टेस्टी आलू लच्छा, सोपी आहे रेसिपी

Maharashtra Politics: ऐतिहासिक विजय! दोंडाईचामध्ये भाजपच्या सर्व २६ नगरसेवकांसह नगराध्यक्ष बिनविरोध

SCROLL FOR NEXT