नागपूर फॅक्टरी स्फोट; मालक असो की मॅनेजर, दोषींवर कडक कारवाई, चंद्रशेखर बावनकुळेंचा आक्रमक पवित्रा

Chandrashekhar Bawankule on Nagpur Factory Blast : यामध्ये संपूर्ण चौकशी केली जाणार आहे. जे जे दोषी आहेत मॅनेजर असो किंवा मालक यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Chandrashekhar Bawankule on Nagpur Factory Blast
Chandrashekhar Bawankule on Nagpur Factory Blast SaamTV
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर : कोतवाल बर्डीमध्ये काल जो ब्लास्ट झाला त्यात दोन कामगारांचा मृत्यू झाला असून तीनजण जखमी आहेत. जखमींवर उपचार सुरू आहे. १ जुलै २०२३ला फायर सेफ्टी डिपार्टमेंट आणि इंडस्ट्रियल डिपार्टमेंटने या कंपनीला बंद करण्याची नोटीस दिली होती. नोटीस दिली असताना सुद्धा ही फायर इंडस्ट्री सुरू होती हा फार मोठा गुन्हा आहे. त्यामुळे यावर कडक कारवाई पोलिसांनी आणि जिल्हाधिकारी यांनी केली आहे, असं भाजपचे नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

यामध्ये संपूर्ण चौकशी केली जाणार आहे. जे दोषी आहेत मॅनेजर असो किंवा मालक यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे जखमींना सुद्धा उपचार दिले जात आहेत. संपूर्ण इंडस्ट्री चालविणे हा फार मोठा दोष आहे. याच्यावर चौकशी होऊन कारवाई केली जाणार आहे.

Chandrashekhar Bawankule on Nagpur Factory Blast
Mumbai News: मुंबईत वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कॅब चालकांकडून वसूल केला 19.76 लाखांचा दंड

यात अजून अटक कोणाला झाली नाही. परंतु या कंपनीला क्लोजर नोटीस दिली असताना नियमाला डावलून हे कंपनी सुरू होती. त्यात दोषी असणाऱ्यांवर कारवाई नक्कीच होणार आहे. नियम पाळून आणि नियमांचं पालन करून इंडस्ट्री चालली पाहिजे. कारण या ठिकाणी दारुगोळा तयार होतो, हे फार सेफ्टीचं काम आहे. त्यामुळे नियंत्रण झालं नाही तर ब्लास्ट होतो, असंही बावनकुळे यांनी सांगितलं.

या कंपनीने नियमांचं उल्लंघन केलं आहे. हा सिरिअस गुन्हा आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा प्रयत्न आमचा सर्वांचा आहे. त्यासाठीच मी या ठिकाणी भेट दिली आहे आणि परिवारांना न्याय मिळाला पाहिजे.

Chandrashekhar Bawankule on Nagpur Factory Blast
Maharashtra Weather : राज्यात उन्हाचा चटका वाढला; अंगाची अक्षरश: लाहीलाही, सर्वाधिक तापमान कुठे?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com