Ravindra Chavan latest news : पुणे येथे पार पडलेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीनंतर भाजपने आता कोकणात संघटनात्मक वाढीसाठी कंबर कसली आहे. याच अनुषंगाने भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा रत्नागिरी-सिंधुदुर्गचा एकदिवसीय दौरा पार पडला. या दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करण्यासोबतच, आगामी वाटचालीसाठी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आणि कडक निर्देश दिले आहेत. आता भाजपचे मुख्य लक्ष कोकणातील प्रत्येक गावावर असणार आहे.
भाजपात कुणी कुणी केला प्रवेश?
मंडणगड नगरपंचायतीमधील पाणीपुरवठा समितीचे सभापती सुभाष सापटे, नगरसेवक शैलेश शिवगण, नगरसेविका समृद्धीताई शिगवण, नगरसेवक दिनेश सापटे, नगरसेविका राजश्रीताई सापटे, खेड पंचायत समितीचे माजी सभापती विजयराव कदम, खेडचे शिवसेना संपर्कप्रमुख राजेंद्र निकम, खेड तालुका शिवसेना उपसंघटक युवराज गुजर, ऐनवरे खेडचे उपसरपंच तानाजी पोफळकर, माणीचे सरपंच राकेश शिंदे, उबाठा भरणे विभागप्रमुख अविनाश वाडेकर, रेहेळे भागडी गावातील माजी सरपंच तुकाराम बामणे, शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख प्रकाश बामणे यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
पदाधिकाऱ्यांना दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश
सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची, तर रत्नागिरीत दक्षिण आणि उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकांमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेत कार्यकर्त्यांना अधिक जोमाने मैदानात उतरावे आणि गावागावात देशभक्त कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करावी, असे कडक निर्देश दिले. तसेच तन, मन आणि धन अर्पण करून पक्षकार्यात योगदान द्या. बूथ पातळीवर संघटना अधिक मजबूत करा, असेही ते म्हणाले. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकासकामे आणि कल्याणकारी योजना समाजातील तळागाळातील आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा. सरकारचे काम आणि विचार लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी जनतेशी सातत्याने संवाद साधा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
पक्ष विस्तारावर भर आणि विरोधकांना धक्का
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार असून, विविध नगरपरिषदांमध्ये मोठ्या संख्येने भाजपचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक कार्यरत आहेत. या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांना आता संघटनात्मक संपर्काची जोड देत पक्षाचा जनाधार विस्तारण्याचे उद्दिष्ट बैठकीत अधोरेखित करण्यात आले. याच दौऱ्यात, उत्तर रत्नागिरीमध्ये विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, ज्यामुळे या भागात पक्ष संघटन अधिक मजबूत झाल्याचे दिसून आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.