Praniti Shinde News: Saamtv
महाराष्ट्र

Political News : वैफल्यग्रस्त अवस्थेतून प्रणिती शिंदेनीं आमच्यावर आरोप केले; कारवरील हल्ल्याच्या आरोपाचे भाजपकडून खंडण

Praniti Shinde : यावेळी मराठा आंदोलकाचा फायदा घेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदेनी केला. या आरोपानंतर भाजपने प्रणितींवर जोरदार हल्ला चढवला आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur :

वैफल्यग्रस्त अवस्थेतू काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेनीं आमच्यावर आरोप केले आहेत, असा हल्लाबोल भाजपकडून करण्यात आला आहे. काल पंढरपूर दौऱ्यावर असताना सरकोली गावाजवळ मराठा आंदोलकानी आमदार प्रणिती शिंदेची गाडी रोखली होती. यावेळी मराठा आंदोलकाचा फायदा घेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदेनी केला. या आरोपानंतर भाजपने प्रणितींवर जोरदार हल्ला चढवला आहे.

"मराठा बांधव संपूर्ण महाराष्ट्रत आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाला सामोरे जायचं सोडून आंदोलनाला राजकीय रुप देण्याचं काम प्रणिती शिंदे करत आहेत. त्यांच्यासोबत कोणीच नाही हे लक्षात आल्याने वैफल्यग्रस्त होऊन त्यांनी असे आरोप केले आहेत, अशी टीका भाजपचे सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी केली आहे.

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेसने गुरुवारी लोकसभेसाठी तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे त्या आपल्या मतदारसंघाची पाहाणी करत होत्या. नागरिकांशी संवाद साधण्यासाठी त्या सरकोली गावात गेल्या, त्यावेळी त्यांच्या कारवर हल्ला झाला. हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला.

घडलेल्या घटनेबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, भाजप कार्यकर्त्यांची चुकीच्या पद्धतीने वर्तवणूक सुरु होती. त्यामुळे मी कारमधून बाहेर आले आणि त्यांना कारला हात लावू नका, असं सांगितलं. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्यांनी प्रयत्न केला. असं कृत्य करणारे आंदोलक नसून भाजपचे कार्यकर्ते होते. आम्ही त्याचा निषेध करतो. या घटनेची मनोज जरांगे यांनीही नोंद घ्यावी,असंही प्रणिती शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं होतं.

'मराठा आंदोलकांच्या नावाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांकडून अशा गोष्टी केल्या जात आहेत. मराठा समाजाने पुकारलेल्या गावाबंदीचे मी समर्थन करते. मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला देखील माझा पाठिंबा आहे, अशा शब्दांत प्रणिती शिंदेंनी भाजपवर निशाणा साधला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लवकरच सीमा बदलणार, सिंध मिळणार; विना लढाईचं PoK येणार भारतात- संरक्षण मंत्री

प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; घरातील जवळच्या व्यक्तीचं निधन

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एन्ट्री

Maharashtra Politics: आघाडीची थाटात घोषणा पण आठ दिवसातच काडीमोड; वंचित-काँग्रेसचं काही जमेना

8000mAh बॅटरी, कॅमेरा, फीचर्स आणि डिजाइनही जबराट; बाजारात हटके मोबाईल लाँच होणार?

SCROLL FOR NEXT