Nanded News Saamtv
महाराष्ट्र

Ajit Gopchade: कारसेवक, बालरोगतज्ज्ञ ते थेट राज्यसभेची उमेदवारी; कोण आहेत अजित गोपछडे?

Nanded News: भारतीय जनता पक्षाने राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत अजित गोपछडे यांचीही राज्यसभेत वर्णी लागणार असल्याने नांदेड जिल्ह्याला डबल लॉटरी लागली आहे.

Gangappa Pujari

Who is Ajit Gopchade:

भारतीय जनता पक्षाने राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण, डॉ. अजित गोपछडे आणि मेधा कुलकर्णी यांच्या नावाचा समावेश आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत अजित गोपछडे यांचीही राज्यसभेत वर्णी लागणार असल्याने नांदेड जिल्ह्याला डबल लॉटरी लागली आहे.

नांदेड जिल्ह्याला डबल लॉटरी!

काँग्रेसला (Congress) सोडून नुकताच भाजपामध्ये पक्ष प्रवेश केलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे यांना भाजपाने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. दे दोन्हीही नेते नांदेड जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्याला डबल लॉटरी लागल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कोण आहेत अजित गोपछडे?

डॉ. अजित गोपछडे यांचे मूळ गाव कोल्हे बोरगाव (ता. बिलोली) असून त्यांचे वडील प्रा. माधवराव गोपछडे तर काका प्राचार्य गोविंदराव गोपछडे आहेत. डॉ. अजित गोपछडे हे संघाचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सुरूवात केलेले गोपछडे हे सध्या भाजपच्या डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्याचबरोबर महाराष्ट्र आरोग्य विद्यापाठीचे ते संचालकही आहेत. नांदेड लोकसभा तसेच नांदेड विधानसभेसाठीही भाजपकडून त्यांचे नाव नेहमीच अग्रेसर असायचे. सुरवातीपासूनच भाजपमध्ये एकनिष्ठ असलेल्या डॉ. गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत काम करताना महाराष्ट्रात डॉक्टरांचे संघटन मजबूत केले आणि त्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे सुरु केली.

मागच्या वेळेस त्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली होती. परंतु काही कारणास्तव उमेदवारी जाहीर होऊन देखील त्यांचा पत्ता कट झाला होता. आता मात्र डॉ. अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करून भाजपाने त्यांना सुखद धक्का दिला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

SCROLL FOR NEXT