Lok Sabha Election 2024 : तर तुम्ही साधी ग्रामपंचायत देखील जिंकू शकणार नाही; अकोलेच्या सभेतून संजय राऊतांचा हल्लाबोल

Lok Sabha Election 2024: अकोलेत उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेतून संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावार जोरदार हल्ला चढवला. EVM बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचं आवाहन त्यांनी केलं.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Saam Digital
Published On

Lok Sabha Election 2024

नगर जिल्ह्यातील अकोलेतील जनता उद्धव ठाकरे यांच्या मागे उभा आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी जे काम केलं त्याची जाणीव आपल्याला आहे. म्हणून भर उन्हात इतक्या मोठ्या संख्येने जनता एकत्र झाली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अकोल्यात शिवसेनेचा उमेदवार किमान ५० हजार मतांनी आघाडीवर राहील, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला व्यक्त केला. आज अकोल्यात बाजारतळ मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. या सभेच्या मचांवरून ते बोलत होते.

राज्यातील जनता आपच्या पाठीशी आहे, त्यामुळे शिवसेनेचा आवाज कुणी दाबू शकत नाही.आमची किती मते फोडाली तरी शिवसेनेला सत्तेत यायला कोणी रोखू शकत नाही. जालन्यात मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली असताना सरकार दुर्लक्ष करत आहे. राज्यात जी हुकूमशाही, गुंडगिरी सुरू आहे, त्याला उत्तर फक्त शिवसेनाच देऊ शकते. EVM बाजूला करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, अकोल्याची ग्रामपंचायत देखील तुम्ही जिंकू शकत नाही, असा टोला त्यांनी भाजप आणि शिंदे गटाला लगावला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Lok Sabha Election 2024
Rajya Sabha Election: भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर; अशोक चव्हाण यांना संधी तर राणेंना डावललं

निवडणुकीच्या आखाड्यात आणखी एक नवीन पक्ष

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडमोडींना वेग आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वारे वाहू लागले आहेत. दुसरीकडे राज्यात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजाने ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी केली. या मागणीला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. याचदरम्यान, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे.

Lok Sabha Election 2024
Cabinet Meeting : विद्यार्थी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; मंत्रिमंडळ बैठकीतील १० महत्त्वाचे निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com