CM Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: दादांच्या एक्झिटसाठी भाजप-सेनेचा प्लॅन? विधानसभेत अजित पवारांना एकटं लढावं लागणार? वाचा...

Mahayuti Dispute News: महायुतीतून अजित पवारांच्या एक्झिटसाठी तगडी प्लानिंग सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. जागावाटपाचा मुद्दा समोर करुन अजित पवारांना महायुतीतून बाहेर पडण्यासाठी दबाव टाकत असल्याची रणनीती आखली जात असल्याचं समजतंय.

Tanmay Tillu

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सामील होऊन एक वर्षांहून अधिक काळ झालाय. राष्ट्रवादी सहभागानंतर सारं काही अलबेल आहे असं चित्र नाही. त्यात आता अजितदादा यांच्या राष्ट्रवादीनं महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्र्य निवडणूक लढवावी, यासाठी भाजप आणि शिंदेंकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचं समजतंय. तसंच, अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर पडल्यास भाजप आणि शिंदे गटाला अधिक जागा लढता येतील, असा 'प्लॅन' आखला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.

नुकतचं शिंदे गट आमदार संजय गायकवाड आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेस नेते, राहुल गांधी यांची 'जीभ छाटण्याची', 'जीभेला चटके देण्या'ची भाषा केली. त्यावर अजितदादांनी नापसंती व्यक्त केलीय. तर आमदार नितेश राणे यांनी मुस्लिमांबाबत केलेल्या वक्तव्याची केंद्रातील वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा इशारा अजितदादांनी दिला होता. आणि यामुळेच विरोधकांना आयत कोलीत मिळालं. तर भाजपकडून सारं काही अलबेल दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून 80 जागांची मागणी होतेय. मात्र, अधिक जागा आपल्याकडे खेचून अजित पवार यांना कमी जागा देण्याची रणनीती भाजप आणि शिंदे गटानं आखली तर कमीत-कमी जागांवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला निवडणूक लढवावी लागणार आहे. लोकसभेला झुकतं माप घेतलेले अजित पवार विधानसभेला ऐकतील का? नाहीतर ही वाटाघाट स्वीकारायची नसेल, तर महायुतीतून बाहेर पडून लढण्याशिवाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीपुढे पर्याय उरणार नाही.

महायुतीमधील जागांचा तिढा?

आगामी विधानसभा निवडणुकीत, भाजपची 160 ते 170 जागा लढवण्याची तयारी, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 100 जागा हव्या आहेत. एकनाथ शिंदे कमीत कमी 90 जागा पदरी पाडणार, असंही बोललं जात आहे. अजित पवारांची कमीत कमी 60 जागांची मागणी आहे. अजित पवारांची केवळ 25 ते 30 जागांवर बोळवण होणार, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

भाजप, शिंदे गटाचा काँग्रेसविरोधी आणि कट्टर हिंदुत्त्ववादाचा पवित्रा अजित पवारांना मान्य नसेल, तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं, असा अप्रत्यक्ष इशाराच गेल्या काही दिवसांत भाजप, शिंदेंकडून अजित पवारांना दिला जातोय. त्यामुळेच भाजप आणि शिंदे गटाचे ठराविक नेते कट्टर हिंदुत्वाची भाषा करत आहेत. आता यामुळेच अजित पवार महायुती बाहेर पडणार की भाजपआणि शिंदेचं चक्रव्यूह भेदणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT