स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.. मात्र या निवडणुकीत अजब गजब प्रकार समोर आलाय...घराणेशाही हद्दपार कऱण्याची भीष्मप्रतिज्ञा करणाऱ्या भाजपनं नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपरिषदेत एकाच घरात 6 जणांना उमेदवारी दिल्याचं समोर आलंय..
गजानन सुर्यवंशी, नगराध्यक्षपदाचे उमेदवार
गोदावरी सुर्यवंशी, पत्नी, नगरसेवकपदाचे उमेदवार
सचिन सुर्यवंशी, भाऊ, नगरसेवकपदासाठी रिंगणात
सुप्रिया सुर्यवंशी, भावजय, नगरसेवकपदासाठी मैदानात
युवराज वाघमारे, मेहुणा, नगरसेवकपदाचा उमेदवार
रीना व्यवहारे, भाच्याची पत्नी, नगरसेवकपदासाठी रिंगणात
मात्र घराणेशाहीविरोधात रान पेटवणाऱ्या भाजपनं एकाच घरात 6 जणांना उमेदवारी दिल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी अशोक चव्हाण आणि भाजपवर हल्लाबोल केलाय..
खरंतर देशात 149 कुटुंबाकडे तर राज्यात 23 कुटुंबाकडे आमदारकी आणि खासदारकी अशी दोन्ही पदं आहेत... त्यात आणखी 33 आमदार, खासदार, मंत्री आणि माजी मंत्र्यांच्या पत्नी, मुलगी, आई, भाऊ यांना उमेदवारी दिलीय.. हे कमी होतं की काय आता स्थानिक पातळीवर एकाच कुटुंबात उमेदवारीचा सिक्सर मारलाय.. हे तर फक्त हिमनगाचं एक टोक आहे.. त्यामुळे राज्यात नेमकी किती कुटुंब सातत्यानं सत्तेचा मलिदा खाणार आणि कार्यकर्ते किती दिवस सतरंज्या आणि नेत्यांच्या चपला उचलणार... याचा विचार आता कार्यकर्त्यांनीच करायला हवा...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.