- रणजीत माजगावकर
कोल्हापूर जिल्ह्यात गव्याचा वाहनधारकरांना माेठा त्रास हाेत असल्याचा गेल्या काही दिवसांपासून घडणा-या घटनांवरुन दिसून येत आहे. जिल्ह्यातील आजरा तसेच राधानगरी या भागात गव्याने कारला धडक दिल्याने नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. वन विभागाने गव्यांचा बंदाेबस्त करावा अशी मागणी जाेर धरु लागली आहे. (Maharashtra News)
आजरा - गडहिंग्लज मार्गावर गव्याने धावत्या मोटारीवर उडी मारल्याने गाडीतील दोघेजण जखमी झाले आहेत. युवराज देशमुख आणि रत्नप्रभा कांबळे अशी जखमींची नावे आहेत. युवराज देशमुख हे मोटारीतून गडिंग्लजकडे चालले होते. त्यांची मोटार म्हसोबा देवाला जवळ आल्यावर रस्ता ओलांडणारा गवा बुजला आणि त्याने मोटारीवर उडी मारली.
गव्याने गाडीला धडक देऊन तो रस्त्यावर कोसळला. जखमी अवस्थेतच त्यांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या जंगलात धूम ठोकली.
यापूर्वी देखील साेमवारी एक घटना घडली हाेती. कोल्हापूर वरून राधानगरी मार्गे कोकणात जाणाऱ्या एका कारला गवा रेड्याने जोरदार धडक दिली. ही घटना राधानगरी परिसरात घडली हाेती. या धडकेत कारचं मोठं नुकसान झाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राधानगरी - दाजीपूर या जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात गव्यांचा वावर आहे. गवे रस्ता ओलांडत वाहनांना धडकतात. त्यामुळे वाहनधारक जखमी हाेताहेत.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.