हयातनगरचा पठाण मुंबईत ठरतोय देवदूत 
महाराष्ट्र

हिंगोलीचा बिस्मिल्ला पठाण मुंबईत गावातील रुग्णांसाठी ठरतोय देवदूत

हयातनगर येथील ग्रामपंचायत सदस्य आयुबखान पठाण यांचा मुलगा बिस्मिल्लाखान पठाण मुंबई येथील महानगरपालिकेत सुरक्षा विभागात आपले कर्तव्य बजावतात.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

हयातनगर ( जिल्हा हिंगोली ) : वसमत तालुक्यातील हयातनगर येथील बिस्मील्लाखान पठाण मुंबई येथील महानगरपालिकेत सुरक्षा विभागात आपले कर्तव्य बजावत असतात. पण नौकरी करत गावातील रुग्णांसाठी धावून जात त्याची चौकशी करुन त्याला योग्य त्या ठिकाणी उपचारासाठी पाठवून ठरतायेत देवदुत. अनेकांना योग्य सल्ला देत करताहेत रुग्णसेवा.

हयातनगर येथील ग्रामपंचायत सदस्य आयुबखान पठाण यांचा मुलगा बिस्मिल्लाखान पठाण मुंबई येथील महानगरपालिकेत सुरक्षा विभागात आपले कर्तव्य बजावतात. पण नौकरी करुन उरलेल्या वेळात आपण ग्रामीण भागातील रुग्णांसाठी काही तरी करावे व त्यांना योग्य उपचार मिळावेत शासनाच्या विविध आरोग्य सुविधा व शासकीय दवाखाने यांची माहिती व्हावी व कोणत्या आजारासाठी कोणता शासकीय दवाखाना योग्य आहे व विविध तज्ञ डॉक्टर यांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन देणे या बाबींमुळे ते परिचित आहेत.

हेही वाचा - पुढाऱ्यांनी आता मराठा समाजाला फसवू नये- छत्रपती संभाजीराजे

मानव सेवा हिच ईश्वर सेवा या भावेनेतुन बिस्मिल्ला खान पठाण सतत झटतात व ग्रामीण भागातील रुग्णांना काय मदत मिळवुन देता येईल याचा सतत प्रयत्न करतात. त्यामुळे आपले मुंबई महापालिकामध्ये नोकरीचे चोख काम करुन उरलेल्या वेळात ते रुग्ण सेवा करतात म्हणून रुग्णदेखील पठाण यांचा धावा करतात व त्यांच्याकडे आशेच्या किरणाने पहातात.

हयातनगर येथील भागवत महाराज गिरी (वय १५ वर्ष) गेल्या काही दिवसांपासून सतत पोट दुखीच्या त्रासाने त्रस्त होता त्याने नांदेड येथील एका खासगी दवाखान्यात उपचार घेतले पण त्या ठिकाणी उपचार घेतल्यानंतर त्याला आराम पडत नव्हता व ही माहिती बिस्मिल्ला खान पठाण यांना साईनाथ गिरी यांनी या रुग्नांची माहीती दिली व त्याने काही डाॅक्टरचे रिपोर्ट व्हाॅटसअपवर पाठवुन मुंबई येथील केईएममधील वरिष्ठ डॉक्टरांना दाखवले. व त्यांनी पठाण यांना सांगितले सदर रुग्णाला ताबडतोब घेऊन या असे सांगितले. त्यानंतर या रुग्णाला मुंबई येथील केईएममध्ये मे महिन्यात ता. २१ रोजी दाखल करुन उपचार केले व तपासणी करुन त्याच्यावर २२ जुन रोजी शस्त्रक्रिया करुन किडीनीच्या दोन्ही बाजूला ३३ एम. एम. स्टोन काढुन डॉ. तुषार बंडगर, प्रोफेसर, हेड डिपार्टमेंट आँफ इंडोक्रिनोजी व त्यांच्या टिमने योग्य काम करुन सदर शस्त्रक्रिया यशस्वी केली व त्या रुग्णाला एक जुलै रोजी दवाखान्यातुन डिजार्ज मिळाला.

यासाठी उपचार लवकर मिळण्यासाठी व सदर रुग्णाला व नातेवाईक यांना खाण्या पिण्याची व राहाण्याची व्यवस्था करुन सदर भागवत गिरी या रुग्णांला मृत्युच्या सापळ्यातुन बाहेर काढले त्यामुळे केईएममधील डॉक्टर व बिस्मिल्ला खान पठाण यांचे कौतुक होत आहे. व बिस्मिल्ला खान पठाण यांचा सत्कार देखील गावातील वरिष्ठांनी करुन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली. यावेळी पठाण यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले मी मुंबईला आहे ग्रामीण जनतेला माहीती नसते त्यांना योग्य मार्गदर्शन व लवकर उपचार कसे मिळतील यासाठी ही रुग्ण सेवेचा वसा सुरु राहणार आहे व गरजुनी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

Narendra Modi News: पुण्यात PM नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान आरक्षणासाठी घोषणाबाजी; पोलिसांची अचानक धावाधाव

SCROLL FOR NEXT