Bird Flu Google
महाराष्ट्र

Dharashiv Bird Flu: ढोकीत बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव; कोंबड्यांनाही लागण

Bird Flu: धाराशिवमधील ढोकी गावात कावळ्यापाठोपाठ कोंबड्यांनाही बर्ड फ्ल्यूची लागण. भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले कोंबड्याचे अहवाल पॉझिटिव्ह, कोंबड्याना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

धाराशिव जिल्ह्यातील ढोकी गावात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात, या परिसरात २७ कावळे मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर, बर्ड फ्ल्यू (H5N1) विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर, आता या परिसरात कोंबड्यांनाही बर्ड फ्ल्यू झाल्याचे समोर आले आहे. भोपाळ येथील प्रयागशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या कोंबड्यांच्या नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्यांना बर्ड फ्लू (H5N1) ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

या परिस्थितीत, बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने कोंबड्या नष्ट करण्याचे आणि त्यांच्या वाहतुकीवर निर्बंध लावण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना, कोंबड्या मृत आढळल्यास, त्वरित पशुवैद्यकीय विभाग किंवा ग्रामपंचायतीला सूचित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कावळ्यांच्या माध्यमातून ढोकीत बर्ड फ्ल्यूचा प्रसार झाल्याचे मानले जात आहे, त्यामुळे दहा किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, पहिल्या बर्ड फ्ल्यू संशयित रुग्णाचा पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवलेला नमुना निगेटिव्ह आला आहे, त्यामुळे सध्या मानवी संसर्गाची घटना नाही.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Viral News : मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेर अर्ध्यारात्री जोडप्याचे अश्लील चाळे; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी

Maharashtra News Live Update: श्रीरामपूर येथील भोंदू अशोक आढावला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी

Census 2026 : स्व-गणना पूर्ण करणारं कोकणातलं हे गाव पहिलं ठरलं

ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झालंय? वेळीच करा रिन्यूअल,नाहीतर येईल डोक्याला हात लावण्याची वेळ; जाणून घ्या प्रोसेस

पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, महागाईचा भडका उडणार? PM मोदींच्या विधानामागे काय आहेत आर्थिक कारणे?

SCROLL FOR NEXT