Nashik Hit And Run Saam tv
महाराष्ट्र

Nashik Hit And Run: राज्यात 'हिट अँड रन' सत्र थांबेना! भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; अपघाताचा थरार CCTVत कैद, VIDEO

Nashik Hit And Run update : राज्यात 'हिट अँड रन' सत्र सुरुच आहे. भरधाव वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Vishal Gangurde

तबरेझ शेख, साम टीव्ही प्रतिनिधी

नाशिक : राज्यात 'हिट अँड रन'चं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये भरधाव रिक्षाने दुचाकीस्वाराला धडक दिली. या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. या हिट अँड रन घटनेत नाशिकमधील नारायण गावच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या अपघाताच्या घटनेनंतर धडक देणाऱ्यांनी पळ काढला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये परदेशी पर्यटकांकडून हिट अँड रनची घटना घडली आहे. रिक्षा चालवणाऱ्या परदेशी महिलेकडून दुचाकी स्वाराला धडक दिली. या धडकेत नारायण गावच्या बाळासाहेब डेरे यांचा मृत्यू झाला आहे. डेरे यांच्या मृत्यूनंतर गावातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर धडक देणाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

घाबरलेले परदेशी पर्यटक नारायण गाव येथून नाशिकला पळाले आहेत. चारही पर्यटक नारायण गाव पोलिसांच्या निगरानित आहेत. परदेशी पर्यटकांमध्ये तीन पुरुष दोन महिलांचा समावेश आहे. नारायण गाव पोलिसांनी संशयित पोलिसांना नोटीस धाडली आहे.

या घटनेतील आरोपींमध्ये महिलांचा देखील समावेश आहे. महिलांना रात्री ताब्यात घेता येत नसल्याने उद्या सकाळी नारायण गाव पोलीस त्यांना ताब्यात घेणार आहेत. परदेशी पर्यटक पळून जाऊ नये म्हणून नाशिक आणि नारायण गाव पोलिसांचां हॉटेल बाहेर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती लागला आहे.

अपघात नेमका कसा झाला?

ओझरच्या धनगरवाडी येथे भरधाव रिक्षाचा धक्का लागल्याने ५८ वर्षीय दुचाकीस्वार बाळासाहेब डेरे यांचा मृत्यू झाला आहे. नारायणगावाकडून ओझरच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना रस्त्याने जाणाऱ्या रिक्षाने कट मारला. त्यानंतर बाळासाहेब डेरे हे डांबरी रस्त्यावर पडले. या अपघातात डोक्याला दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा तपास नारायणगाव पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai 26 July 2005 Rain : मुंबईतील 'त्या' भयानक दिवसाला 20 वर्षे पूर्ण! | VIDEO

Yoga For Eyes: डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी दररोज करा 'हे' योगासन

सोलापूरात नवऱ्यानं बायकोच्या डोक्यात फरशी मारली; जागीच मृत्यू, कारण फक्त.. नक्की काय घडलं? | Crime

Free Data Offer: 'या' कंपनीने आणली जबरदस्त ऑफर, रोज १ जीबी फ्री डेटा मिळणार

Maharashtra Live News Update: पुण्याच्या जीएसटी पथकाची नाशिकमध्ये छापेमारी

SCROLL FOR NEXT