Bihar Election  Saam tv
महाराष्ट्र

Bihar Election : बिहारमध्ये भाजप सत्तेत येणार, शरद पवारांच्या आमदाराने सांगितले गणित

Sharad Pawar camp MLA alleges BJP vote theft Bihar election : बिहार निवडणुकीत भाजप ३० टक्के मते घेऊनही सत्तेत येईल असा दावा शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला. विरोधकांच्या मतांत विभागणी करून मतचोरी होईल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

Namdeo Kumbhar

भारत नागणे, साम टीव्ही प्रतिनिधी, पंढरपूर

Uttam Jankar claims BJP to win Bihar with 30 percent votes : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय होणार असा मोठा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे. बिहारमध्ये भाजप 30 टक्के मते घेऊन सत्तेत येईल, असा थेट आरोप शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला. भाजप मतचोरी करून सत्तेत येईल अशी शंका देखील व्यक्त केली आहे.

शनिवारी मत चोरीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा झाला. त्यानंतर आमदार जानकर यांनी भाजपवर मतचोरीचा आरोप करत बिहारमध्ये ३० टक्के मते घेऊनही सत्तेत येतील, असा दावा केला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत 70 टक्के मतदान विरोधी पक्षांना पडूनही भाजप सत्तेवर आलेले दिसेल असे गणित ही आमदार जानकर यांनी मांडले आहे.

जानकर यांनी नेमकं गणित कसे मांडले ?

प्रशांत किशोर यांच्या पक्षाला राजदची मते वळवली जातील. तेज प्रताप यादव यांना सुद्धा राजद आणि काँग्रेसची काही मते वळवली जातील. अशी 35 टक्के मते वळवली जातील. उरलेल्या 65 टक्के मतात राजदला 35 टक्के आणि भाजपला 30 टक्के मतदान दाखवले जाईल. राजदचे 50 उमेदवार एक लाखाच्या फरकाने निवडून आणले जातील. भाजप मात्र आपले उमेदवार 10 ते 20 हजाराच्या फरकाने निवडून आणेल. यातून भाजप सत्तेच गणित जुळवत 110 ते 115 जागा पर्यंत पुढे जाईल. देशापुढे असे चित्र तयार केले जाईल. 70 टक्के मते विरोधात पडली तरी 30 टक्के मते घेऊन भाजप सत्तेत आलेला दिसेल असे भाकित जानकर यांनी केले आहे.

त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान होण्यापूर्वीच आमदार जानकर यांनी भाजप कशा पद्धतीने सत्तेत येईल याचे गणित मांडले आहे. आमदार जानकर यांनी या निमित्ताने पुन्हा एकदा मतचोरी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जानकर यांच्या वक्तव्यानंतर सोलापूरमध्ये राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women World Cup Final: हातात तिरंगा आणि पाणावलेले डोळे! एकमेकींना मिठी मारल्यानंतर हरमनप्रीत-स्मृतीला अश्रू अनावर

Rohit Sharma Reaction: रोहितला आठवला 19 नोव्हेंबर? महिलांनी वर्ल्डकप जिंकताच स्टँडमध्ये बसलेला हिटमॅन भावूक; रिएक्शन होतेय Viral

हरमनप्रीत कौरचा जबरदस्त डाव; त्या दोन षटकांत गेम फिरला, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या हातून ट्रॉफी हिसकावली

ICC Women World Cup: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा वर्षाव; भारताला अन् उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला किती मिळणार पैसा?

IND W vs SA W Final: ५२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महिलांनी लिहिला इतिहास; टीम इंडियाच्या तीन खेळाडूंनी बदलली फायनलची कहाणी

SCROLL FOR NEXT