Maharashtra's Shaktipith Expressway Saam TV (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

Shaktipith Mahamarg: मोठी बातमी! शक्तिपीठ महामार्गात बदल, आता कोणत्या जिल्ह्यातून आणि कसा जाणार?

Maharashtra Shaktipith Expressway: राज्यात लकवरच शक्तिपीठ महामार्ग तयार होणार आहे. या महामार्गाच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. या महामार्गाचे काम २०२६ पासून सुरू करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Priya More

Summary -

  • शक्तिपीठ महामार्गाची अलाइनमेंट बदलण्यात आली

  • सोलापूर आणि सांगलीमार्गे शक्तिपीठ महामार्ग नेण्याचा निर्णय

  • ग्रीनफिल्ड संकल्पनेनुसार नवीन भागांचा विकास साधण्याचा सरकारचा प्रयत्न

  • २०२६ पासून महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्याचे उद्दिष्ट

शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. शक्तिपीठ महामार्गात काहीसा बदल करण्यात आला आहे. आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली. सोलापूर आणि सांगलीतून पुढे असा हा महामार्ग जाणार आहे. या महामार्गात नेमका काय बदल करण्यात आला आणि हा बदल का करण्यात येत आहे याची माहिती मुख्यमंत्र्यांची दिली. हा शक्तिपीठ महामार्ग फडणवीस सरकारचा ड्रीम प्रोजेक्टपैकी एक आहे. या महामार्गाचे काम २०२६ पासून सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

...म्हणून अलाइनमेंट बदवली

शक्तिपीठ महामार्गाची अलाइमेंट का बदलण्यात आली याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले की, 'शक्तिपीठ महामार्गाबाबत एक आक्षेप होता तो खरा होता. आपण जी अलाइमेंट फायनल केली होती ती लोकांनी आपल्या लक्षात आणून दिली की सोलापूरपासून आपली अलाइनमेंट ही राष्ट्रीय महामार्गाला पॅररल जात होती. त्याच्यामुळे ग्रीन फिल्ड महामार्ग यासाठी बनवतोय की त्यामुळे नवीन एरिया ओपनअप होतात. ग्रीन फिल्डमुळे अनकनेक्टड लोकं त्याच्याशी कनेक्टेड होतात आणि त्यामुळे तिथपर्यंत विकास जातो. म्हणून जयकुमार गोरे आणि अभिजीत यांच्याशी चर्चा केली. याची सोलापूरपासून एक वेगळी अलाइनमेंट आम्ही तयार केली आहे जी चंदगडपासून पुढे म्हणजे सोलापूरातून जाते मग सांगलीतून जाते.'

जयंत पाटील यांच्या मतदारसंघाचा फायदा होईल

शक्तिपीठ महामार्गाबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटील यांना देखील टोमणा मारला. ते म्हणाले की, 'आमचे जयंत पाटील सुटून होते शक्तिपीठ महामार्गातून पण आता आम्ही तुमच्या जवळ महामार्ग आणला. मी तुम्हाला दाव्याने सांगतो की जयंतराव मला पत्र देतील की हा महामार्ग करा कारण त्याचा फायदा त्यांच्या मतदारसंघाला होणार आहे. हा महामार्ग पंढरपूरजवळून जातो. आपले आधीचा जॉईंट मेजरमेंट झाले आहे. चंदगडमधील लोकांनी तर मोर्चा काढून आमच्याकडून महामार्ग न्या अशी मागणी केली त्यामुळे तिकडे काही अडचणी नाहीत. ज्यांच्याकडून आम्ही अलाइनमेंट काढली आता तेही लोकं आमच्याकडे आलेली आहेत ते सांगतात आता अलाइनमेंट काढू नका. ते म्हणतात तुम्ही इथूनच अलाइनमेंट ठेवा. त्यांना आम्ही सांगितले की तुमच्याविरोधामुळे आम्ही अलाइनमेंट काढली नाही.'

२०२६ पासून काम सुरू करण्याचा प्रयत्न

तसंच, 'प्रतिशक्ती प्लॅटफॉर्मवर तो मार्ग नेल्यामुळे जवळपास सर्व वन जमीन आम्हाला वगळता आली आणि अगदी थोडीशी वनजमीन आली त्यामुळे आम्हाला परवानगी मिळणं सोपं झाले. हा महामार्ग आपली सर्व शक्तिपीठं कनेक्ट करेलच त्यासोबत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जो दुष्काळी भाग आहे त्याचे चित्र बदलणारा महामार्ग ठरेल. याचे काम २०२६ मध्येच सुरू झाले पाहिले असा आमचा प्रयत्न सुरू आहे. या एका महामार्गामुळे आपला १८ तासांचा प्रवास ८ तासांवर येणार आहे. सगळ्यात महत्वाचे लूप तयार होईल. समृद्धी महामार्ग, नांदेड-जालना महामार्ग आणि हा महामार्ग यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याला इंडस्ट्रीजचे अॅडव्हानटेज मिळणार आहे. आतापर्यंत इंजस्ट्रीज जिथे पोर्ट कनेक्टिव्हिटी आणि लॉजेस्टिक कनेक्टव्हिटी आहे तिथेच जात होती. आता हा महामार्ग तयार झाल्यानंतर ३२ जिल्ह्यांना कनेक्टिव्हिटी मिळेल. त्यामुळे हा महामार्ग महाराष्ट्रातला गेम चेंजर महामार्ग ठरणार आहे.', असे मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचे होणार लोकार्पण

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

SCROLL FOR NEXT