BJP Suffers Setback by deputy cm eknath shinde Saam
महाराष्ट्र

Nashik Politics: मोठी बातमी! नाशिकमध्ये भाजपला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंनी ३ बडे नेते फोडले

BJP Suffers Setback by deputy cm eknath shinde: नाशिकमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली. एकनाथ शिंदेंनी भाजपला मोठा धक्का दिला. शिंदेंनी भाजपचे ३ बडे नेते फोडले. या तिघांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतलं.

Priya More

Summary -

  • नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय उलथापालथ

  • माजी आमदार नितीन भोसले यांचा शिंदे गटात प्रवेश

  • तिकीट नाकारल्याने भाजपला ठोकला रामराम

  • एकाच दिवशी ३ बड्या नेत्यांनी भाजप सोडल्याने पक्षाला मोठा धक्का

नाशिकमध्ये महानगर पालिका निवडणुकीदरम्यान मोठी राजकीय उलथापालथ झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का दिला. १० दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदाराने पक्षाला रामराम ठोकला. माजी आमदार नितीन भोसले यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या नितीन भोसले यांनी धनुष्यबाण हाती घेतले. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. नितीन भोसले यांच्यासोबत आणखी दोन बड्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. एकाच दिवसात भाजपच्या ३ बड्या नेत्यांनी शिंदेगटात प्रवेश केल्यामुळे नाशिकमध्ये भाजपला खिंडार पडले.

नितीन भोसले हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीन भोसले यांनी २५ डिसेंबर रोजी भाजपचा झेंडा हाती घेतला होता. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसला होता. महापालिका निवडणुकीसाठी तिकीट मिळेल या आशेने नितीन भोसले यांनी १० दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण ऐन वेळी नितीन भोसले यांना भाजपकडून तिकीट नाकारले गेले. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती.

महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने कुटुंबीयांना संधी दिली नाही त्यामुळे नितीन भोसले यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. अवघ्या १० दिवसांत त्यांनी पक्ष बदलल्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे. फक्त नितीन भोसलेच नाही तर नाशिकमध्ये आणखी दोन बड्या नेत्यांनी भाजपची साथ सोडली.

माजी महापौर अशोक मुर्तडक आणि माजी महापौर दशरथ पाटील यांनी देखील मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे एकाच दिवसांत ३ बड्या नेत्यांनी भाजपची साथ सोडल्यामुळे हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

माजी महापौर दशरथ पाटील आणि माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी मंगळवारी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले. २००३- ०४ च्या कुंभमेळ्यावेळी दशरथ पाटील महापौर होते. तर २०१५- १६ च्या कुंभमेळ्यावेळी अशोक मुर्तडक महापौर होते. ३ बड्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाची नाशिकमध्ये ताकद वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यातील सर्वाधिक थंडी पूर्ण शहरात, पारा ९.५ अंशावर

Yoga Time: योगा कधी करावा? सकाळी की संध्याकाळी? जाणून घ्या योगासनांची योग्य वेळ

Ladki Bahin Yojana: ४ दिवसात लाडकीच्या खात्यात खटाखट ₹ ३००० येणार, बड्या मंत्र्यांची घोषणा

Success Story: कौतुकास्पद! IPS ट्रेनिंगदरम्यान झाले IAS; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; ऋत्विक वर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींच्या आज आर्थिक समस्या सहज दूर होतील; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT