Uddhav Thackeray on Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray: शिंदेंचा ठाकरेंना धक्का, बड्या नेत्याचा पक्षाला 'जय महाराष्ट'; धनुष्यबाण घेणार हाती

Umesh Patil joins Eknath Shinde Shiv Sena: एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. जळगावमधील बड्या नेत्याने ठाकरेंची साथ सोडली. ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Priya More

Summary -

  • जळगावचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला

  • ते ६ मार्च रोजी मुंबईत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत

  • त्यांच्या पक्षप्रवेशामुळे जळगाव आणि चाळीसगावमध्ये शिंदेगट बळकट होणार

राज्याच्या राजकारणात एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का दिला. जळगावमधील एका बड्या नेत्याने उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. ठाकरेसेनेचे जळगावातील नेते आणि माजी खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम ठोकला. ते लवकरच शिवसेना शिंदेगटामध्ये प्रवेश करणार आहेत. ६ मार्चला मुंबईमध्ये हा पक्षप्रेवश सोहळा होणार आहे.

उन्मेष पाटील यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने तिकीट नाकारल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी भाजपची साथ सोडत तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी २०२४ मध्ये शिवसेना ठाकरेगटाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. ते आता शिवसेना शिंदेगटात प्रवेश करणार आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे जळगाव आणि चाळीसगावमध्ये शिंदेगटाची ताकद चांगली वाढली.

६ मार्च रोजी मुंबईमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उन्मेष पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेशादरम्यान ते मोठं शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे सांगितले जात आहे. उन्मेष पाटील यांनी सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी पक्षप्रवेशाबाबत चर्चा केली होती.

त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांची त्यांनी दिल्लीमध्ये भेट घेत पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केला होता. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पद्धत चांगली असल्याचे सांगितले. छत्रपती संभाजीनगरच्या बँकेकडून उन्मेष पाटील यांच्या मालमत्तेची जप्तीची कारवाई सुरू होताच त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यसभा निवडणुकीपूर्वी धमाका; 'हा' पक्ष भाजपमध्ये विलीन होणार? दिल्लीत हालचालींना वेग

WhatsApp वरुन २ मिनिटांत करा आधार कार्ड डाउनलोड, स्टेप बाय स्टेप प्रोसेस करा फॉलो

Holi Skin Care: साबण किंवा फेसवॉशने होळीचे रंग निघत नाहीत? मग या घरगुती सामग्रीने आरामात जातील रंग

Maharashtra Live News Update : खग्रास चंद्रग्रहणामुळे आज साडेतीन तास साईदर्शन राहणार बंद

Chandra Grahan: आज ३ मार्चला ग्रहणात काय करावे? हे आहेत ७ महत्त्वाचे उपाय

SCROLL FOR NEXT