

संभाजीनगरमधील मंत्र्यांच्या भुतांचा वावर विधानामुळे वाद निर्माण
विरोधक आणि अंनिसकडून तीव्र प्रतिक्रिया
अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या पार्श्वभूमीवर प्रश्नचिन्ह
महापालिकेच्या जागेच्या वादाला नवं वळण
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भुतांचा वावर आहे, हे राज्यातील मंत्र्यांनं केलेलं विधान आता वादाच्या भोवऱ्यात अडकलयं. आधीच खरात प्रकरणावरून अंधश्रद्धेचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना मंत्र्य़ानं भुताची थिअरी का मांडलीय. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
छत्रपती संभाजीनगरचं राजकारण सध्या एका विचित्र वळणावर येऊन ठेपलयं. ज्या शहरात विकासकामांची चर्चा व्हायला हवी, तिथे आता 'प्रेतात्म्यांची' चर्चा सुरू झालीय आणि याला कारण ठरलयं. मंत्री संजय शिरसाटाचं वादग्रस्त विधान. अंधश्रद्धेला खतपाणी घालणार काय विधान केलंय मंत्री संजय शिरसाटांनी ते ऐका.
खर तर संभाजीनगर महापालिकेची आत्ताची इमारत ही प्रशासकीय कामाच्या दृष्टीने अपुरी पडते. या प्रशासनाच्या इमारतीला लागूनच कब्रस्तान आहे... मात्र दुसरीकडे कार्यालय नेण्याएवजी, महापालिकेत आत्मे फिरत असल्यानं जागा बदला, या शिरसाटांच्या सल्ल्यावर विरोधक चांगलेच तुटून पडलेत. दुसरीकडे संभाजीनगर महापालिकेच्या जागेच्या वादात आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही उडी घेतलीय. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या शिरसाटांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अंनिसनं केलीय.
मुळात संजय शिरसाट हे सध्या सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत, त्याच विभागानं 2013 साली राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणला होता.त्यामुळे छत्रपती संभाजीनगर महापालिकेत आत्मे फिरत असल्याचं विधान शिरसाटांनी करणं कितपत योग्य आहे. आधीच खरात प्रकरणामुळे अनेक राजकीय नेते अडचणीत आलेले असताना भोंदूगिरीला थेट राजकीय व्यासपीठावर प्रोत्साहन देऊन आपण समाजापर्यंत काय विचार नेतोय याचा विचार राजकीय नेते कधी करणार.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.