CM Devendra Fadnavis On Loan Waiver saam tv
महाराष्ट्र

Good News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; खात्यात कधी पैसे येणार?

CM Devendra Fadnavis On Loan Waiver: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली. कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी उद्या जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

Priya More
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली

  • शेतकऱ्यांची पहिली यादी उद्या जाहीर होणार

  • कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा

  • यादीनंतर लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली. कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून येत्या ३० जुलैआधी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल अशी चर्चा होता. सरकारकडून देखील कर्जमाफीसंदर्भात जोरदार हालचाली सुरू आहेत. अशामध्ये मुख्यमंत्र्यांनी थेट कर्जमाफीबाबत महत्वाची अपडेट दिली त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधत राज्यासह देशातील अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबाबत महत्वाची अपडेट दिली. त्यांनी सांगितले की, कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी उद्या जाहीर केली जाणार आहे. उद्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी बाबासाहेब पाटील तयारी करत आहेत.'

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना विरोधकांवर टीका केली. त्यांनी सांगितले की, 'कुठलंही आंदोलन असले की काही चुकीच्या प्रवृत्ती आंदोलनात शिरत असतात. ते आपला स्वार्थ साधत असतात. दिल्लीतल्या आंदोलनात अनेक राजकीय पक्ष आणि संघटना आपापले हेतू साध्य करून अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत.'

तंसच, 'दिल्लीतील आंदोलन हे चेहराहीन होते त्यामुळे ते भरकटलं आहे. आंदोलकांनी पोलिसांची वाहनं फोडली, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. पोलिसांनी वेळीच सगळं कंट्रोल केलं नसतं तर मोठा अनर्थ घडला असता. मी सगळ्या आंदोलनावर आरोप करत नाही पण काही लोक चांगल्या भावनेनेही आंदोलनं करत असतील. पण काही लोकांना अराजकता माजवण्याचा हेतू असतो.’, असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

सरकारकडून विद्यार्थ्यांच्या भविष्यावर लाठीचार्ज; उद्धव ठाकरेंचा केंद्रावर हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT