Fact Check: गाड्यांवर लिंबू-मिरची लावल्यास दंड? गाडी मालकाला 5 हजारांचा दंड लागणार?

Lemon Chilli Vehicle Fine: आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो... आता गाड्यांना लिंबू-मिरची लावली तर 5 हजार रुपयांपर्यंत दंड लागणार असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच असा नवीन नियम करण्यात आलाय का...? या दाव्यात तथ्य आहे का...?याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात..
LEMON-CHILLI VEHICLE FINE VIRAL CLAIM FACT CHECK
LEMON-CHILLI VEHICLE FINE VIRAL CLAIM FACT CHECKsaam tv
Published On

वाहनावर लिंबू आणि मिरची लावल्यास आता 5 हजारांचा दंड आकारला जाणार आहे... होय, असा मेसेज व्हायरल होतोय...बरेच जण गाड्यांना लिंबू-मिरच्या लावतात...त्यामुळे या दाव्यात खरंच तथ्य आहे का...? लिंबू मिरची लावल्यास 5 हजारांचा दंड लागणार आहे का...? हा मेसेज व्हायरल होत असल्याने संभ्रम निर्माण झालाय...त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

काही लोक वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी आपल्या वाहनांवर लिंबू आणि मिरची लटकवतात.आता वाहनावर लिंबू आणि मिरची लावल्यास 5 हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. काही लोक वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी आपल्या वाहनांवर लिंबू आणि मिरची लटकवतात. पण आता असे केल्यास पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागेल का? अनेकांना हाच प्रश्न पडलाय...काहींनी तर जर राफेलवर लिंबू आणि मिरची लटकवली जाऊ शकते, तर वाहनांवर का नाही? असाही सवाल केला...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने वाहतूक पोलिसांकडून ही माहिती मिळवली...त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

वाहनाच्या नंबर प्लेटवर नोंदणी क्रमांक दिसला पाहिजे

वाहनांवर लिंबू मिरची लावणे हा गुन्हा ठरत नाही

लिंबू मिरची लावून नंबर प्लेट हाईड केल्यास कारवाई

नंबर प्लेटवर छेडछाड केल्यास 5 हजारपर्यंत दंड होतो

सप्टेंबर 2021 मध्ये दिल्ली पोलिसांनी नंबर प्लेटवर लिंबू मिरची लावणाऱ्या वाहनांना चलन जारी केले होतं...

पण, या मेसेजमध्ये छेडछाड करून वाहनाला लिंबू मिरची लावल्यास कारवाई होणार असल्याचा दावा केला...मात्र. नंबर प्लेट व्यतिरिक्त वाहनावर इतरत्र कुठेही लिंबू आणि मिरची लावल्यास कोणतेही चलन जारी केले जात नाही...त्यामुळे आमच्या पडताळणीत वाहनांना लिंबू मिरची लावल्यास 5 हजारांचा दंड आकारला जातो हा दावा असत्य ठरलाय...नंबर प्लेटवर छेडछाड केल्यास कारवाई होते...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com