Dhule Shivsena Shinde Group Saam tv
महाराष्ट्र

Politics: धुळ्यात मोठी राजकीय घडामोड, भाजपला एकनाथ शिंदेंकडून जोरदार दणका; बड्या नेत्यांनी हाती घेतलं 'धनुष्यबाण'

Dhule Shivsena Shinde Group: धुळ्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेना शिंदे गटाने भाजपसह इतर पक्षांना जोरदार धक्का दिला आहे. अनेक बड्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी धनुष्यबाण हाती घेतलं. यामुळे धुळ्यात शिंदेसेनेची ताकद वाढली.

Priya More

Summary -

  • धुळ्यात मोठी राजकीय घडामोड घडली

  • शिवसेना शिंदे गटाची धुळ्यात ताकद वाढली

  • भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला

  • आमदार मंजुळा गावित यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला

भूषण अहिरे, धुळे

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू आहे. अशातच धुळ्याच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे. याठिकाणी शिवसेना शिंदेसेनेने काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाल्याने धुळ्यामध्ये राजकीय समीकरणे बदलली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगरपरिषदेवर झेंडा फडकवण्यासाठी शिंदेसेनेने चांगलीच कंबर कसल्याचे दिसून येत आहे. धुळ्यामध्ये आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यात शिवसेना शिंदे गटाला मोठं यश आले आहे. आमदार मंजुळा गावित यांच्या उपस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपमधील मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेत पक्ष प्रवेश केला आहे.

नव्याने स्थापन झालेल्या पिंपळनेर नगरपरिषदेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वच पक्षांतर्फे रणनीती आखण्यात येत असून शिंदेसेनेत झालेल्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप या सर्वच पक्षांना मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात धुळ्यामध्ये राजकीय घडामोडींना आणखी वेग येणार असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीपूर्वी धुळ्यामध्ये शिंदे गटाची ताकद वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bread Pizza Burger : ब्रेडपासून बनवा पिझ्झा- बर्गर; घरच्या घरी बनवा, रेसिपी लगेच लिहून घ्या

Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचं ४४ व्या वर्षी निधन, लिव्हर इन्फेक्शनने घेतला जीव; सिनेसृष्टीवर शोककळा

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रात काँग्रेसला विक करण्यात शरद पवारांसह इतरांची भूमिका महत्वाची - नाना पटोले

३७ व्या वर्षी अजिंक्य नाईक बनले MCAचे सर्वात तरुण अध्यक्ष|VIDEO

Eyebrow Care: ओव्हरप्लक्ड Eyebrows पुन्हा कसे वाढवायचे? पातळ झालेल्या भुवयांसाठी हे घरगुती उपाय ठरतील बेस्ट

SCROLL FOR NEXT