AIMIM Withdraws Support from BJP-Led Front Saam Tv
महाराष्ट्र

Akola Politics: अकोल्यात मोठी राजकीय घडामोड, भाजप-एमआयएमची युती अखेर तुटली

AIMIM Withdraws Support from BJP Led Front: अकोल्यातल्या अकोट नगरपंचायत निवडणुकीमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भाजपने- एमआयएमची युती तुटली. अकोट शहर विकास मंचाला दिलेले समर्थन एमआयएमने मागे घेतले.

Priya More

Summary -

  • अकोट नगरपंचायतीतील भाजप- एमआयएम युती अखेर तुटली

  • एमआयएमने अकोट विकास मंचाला दिलेला पाठिंबा मागे घेतला

  • एमआयएमचे ५ नगरसेवक आघाडीतून बाहेर पडले

  • राज्यभरात भाजप-एमआयएम युतीवर टीका झाल्यानंतर पक्षाकडून निर्णय

अकोल्यातून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. अकोट नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने एमआयएमसोबत युती केली होती. या युतीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. पण भाजप-एमआयएमची युती अखेर तुटली आहे. एमआयएम पक्ष अकोटमधील भाजपच्या नेतृत्वाखालील 'अकोट विकास मंचा'तून बाहेर पडला आहे. या स्थानिक आघाडीतून बाहेर पडत असल्याचे एमआयएमचे पत्र 'साम'टीव्हीच्या हाती लागले आहे.

एमआयएम पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष युसूफ पुंजांनींनी हे पक्षाचे पत्र दिले आहे. एमआयएमच्या अकोट नगरपालिकेतील पाचही नगरसेवकांनी जिल्हाधिकार्यांना आघाडीतून बाहेर पडत असल्याचे पत्र दिले. अकोट नगरपालिकेत हिंदुत्वाच्या बाता करणाऱ्या भाजपची एमआयएमशी आघाडी झाली होती. नगरपालिकेत बहुमत नसलेल्या भाजपने ५ नगरसेवक असलेल्या एमआयएमला सोबत घेतले होते. आता एमआयएम'ने दिलेलं समर्थन मागे घेतले आहे.

भाजपने स्थापन केलेल्या अकोट विकास मंचात एमआयएम दोन्ही सेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती पार्टी सहभागी झाली होती. भाजप-एमआयएम युतीची राज्यभरात जोरदार चर्चा झाली होती. राज्यात महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू असताना एमआयएम आणि भाजप एकत्र आले.या फटका आपल्याला बसू शकतो हे एमआयएमच्या लक्षात आले. त्यानंतर एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी नारीजी व्यक्त केली. त्यानंतर अकोट शहर विकास मंचाला दिलेले समर्थन अर्थात पाठींबा एमआयएमने मागे घेतले आहे.

अकोट नगरपालिकेत भाजपच्या आघाडीतून बाहेर पडलेले एमआयएमचे ५ नगरसेवक -

१) रेश्मा परवीन मोहम्मंद अजीम

२) युसुफ खान हादीक खान -

३) हन्नान शाह सुलतान शाह-

४) दिलशाद बी रज्जाक खाँ -

५) अफरीन अंजुम मो. शरीफोद्दीन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Post: रोहित शर्मा मोठी घोषणा करणार; 'त्या' एका पोस्टने उडाली खळबळ, आभाळाऐवढी उत्सुकता

Horoscope: जीवनात येणार नवं प्रेम; ४ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; खर्चावर ठेवा नियंत्रण

मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार, एअर होस्टेस पिंकी माळीचे वडिलांसोबतचे शेवटचे शब्द

अजित पवारांचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्स सापडला, गूढ उकलणार?

दादांचा पायलट दोन वेळा निलंबीत, 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान

SCROLL FOR NEXT