अकोला पश्चिममध्ये भाजपतिकीट वाद आणि पक्षांतर्गत कलह
सरचिटणीस रमेश अलकरी यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे राजीनामा दिला
राजीनामा देत पक्षाला पत्र लिहलं आहे
अक्षय गवळी, अकोला
राज्यात महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर कुणी तिकीट देता का तिकीट अशाप्रकारचे सूर ऐकायला मिळाले. तसेच जागावाटपांवरून देखील मोठे नाट्य पाहायला मिळाले. महायुतीत एकमत नसल्याने महायुतीत बिनसलं कि काय? अशा देखील चर्चा रंगल्या. दरम्यान उमेदवारी नाकारल्याने भाजपमध्ये उद्रेक सुरूच आहे. अशातच अकोल्यात भाजपात निष्ठावंतांना डावलून बाहेरच्यांना तिकीट दिल्याने पक्षात उद्रेक पाहायला मिळतो आहे. गेल्या ३० वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला अकोला पश्चिम विधानसभामध्ये पक्षाचा पराभव झाल्यानंतर आता तिथेचं निवडणुकीत पक्षाअंतर्गत खदखद वाढत आहे. भाजपच्या सरचिटणीस रमेश अलकरी यांनी तिकीट नाकारल्यामुळे पदाचा राजीनामा देत त्यांनी पत्राद्वारे खंत व्यक्त केली आहे. दरम्यान दुसरीकडे अकोला महापालिकेचे माजी सभापती सतीष ढगे यांनी देखील पक्षाला तिकीट नाकारल्याचं उत्तर मागितलं आहे.
सरचिटणीस अलकरी यांनी पत्रात म्हटले आहे की, गेले 3 टर्म पासून भाजपकडं नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारी म्हणून अर्ज दाखल केला आहे. प्रत्येकवेळी मला पुढील वेळी विचार करू, असे सांगत थांबण्याची सूचना दिल्या. अनेक नेतेमंडळींचा आदेश असल्यामुळे माझ्या इच्छुक उमेदवारीचा अर्ज मागे घेतला. पक्षाने सांगितलेल्या उमेदवारांना व पॅनलला निवडून आणण्यासाठी परिश्रम घेतले आणि प्रत्येक वेळी निवडून आणले. यावेळी मी प्रभाग 10 मध्ये उमेदवारीसाठी अर्ज दाखल करून मुलाखत दिली होती. असं त्यांनी म्हटलं.
पुढे बोलताना अलकरी म्हणाले, पक्षाने यावेळेस माझा विचार करू असे, मला सांगितले. पण दरवेळेस प्रमाणे याही वेळी माझी उमेदवारी नाकारण्यात आली, त्यासाठी कुठलेही पक्षाने मला ठोस कारण दिलेले नाही. एक कार्यकर्ता म्हणून मला हे कारण जाणून घेण्याचा निश्चितच अधिकार आहे. पण कुठलेही सबळ कारण न देता किंवा काहीही न सांगता मला डावलण्यात आले. या सर्व प्रकारामुळे व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत राजकारणाला व कायमच निष्ठावंताना डावलले गेले. आणि आयारामांना पायघड्या घालण्याच्या प्रकाराला कंटाळून आजपासून पक्षाच्या संबंधित सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं.
भारतीय जनता पक्षाबद्दल मला कुठलाही आकस किंवा द्वेष नाही. आजही मनाने भारतीय जनता पक्षाचाच आहे, त्यामुळे मी कुठल्याही अन्य पक्षात जाऊन, जी सहज मिळू शकत होती ती उमेदवारी न घेता अपक्ष म्हणून ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. आज जरी स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांनी मला त्यांच्या राजकारणापायी सतत डावलले तरी प्रभागातील जनता मला बहुसंख्येने निवडून देईल, असा विश्वास त्यांनी पत्रातून व्यक्त केला आहे. दरम्यान त्यांच्या या पत्रावर भाजपकडून नेमकं काय उत्तर मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.