मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या रामगिरी महाराजांवर तातडीने कारवाई करा अन्यथा मुंबईपर्यंत मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला. त्यांच्या या इशाऱ्यावर टीका करताना एमआयएम हा पक्ष फक्त थुंकल्यावर वाहून जाईल, अशी गलिच्छ टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली. दरम्यान, त्यांच्या या टीकेचा एमआयएमचे नेते फारुख शाब्दि यांनी चांगलाच समाचार घेतला.
थुंकणं तर दूरच एमआयएमवाले नुसते फुंकले तरी राणे बंधू हवेत उडून जातील, असा टोला एमआयएमचे नेते फारुख शाब्दि यांनी लगावला. आगामी विधानसभा निवडणुकीत निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा शाब्दि यांनी यावेळी दिला. ते सोलापूर येथे माध्यमांसोबत बोलत होते.
राणे बंधूंचं नाव घेतलं तरी माझ्या तोंडात थुंक येते, अशी जहरी टीका फारुख शाब्दि यांनी केली. नितेश राणे (Nitesh Rane) आणि निलेश राणे या दोन्ही भावांना भारतीय जनता पक्षाने मुद्दामहून अशा प्रकारच्या टीका करण्याचं काम दिलंय. जेणेकरून महाराष्ट्रातील जनतेचे विकासाच्या मुद्द्यावरून ध्यान भरकटले जाईल. त्याचबरोबर बदलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळण्याची घटना लोक विसरु जातील, असा घणाघात शाब्दि यांनी केला.
पुढे बोलताना शाब्दि म्हणाले, नितेश राणे यांना आमच्या नेते इम्तियाज जलील यांनी उत्तर दिलेलं असून त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर आम्ही 5 दिवसांत मुंबईत मोर्चा घेऊन येणार आहोत. आज निलेश राणे जे घाणेरडे शब्द वापरले. ते बोलण्याची त्यांची लायकी नाही. याला जबाबदार मुस्लिम समाज आणि अल्पसंख्ख्याक समाज देखील आहे, असं शाब्दि म्हणाले.
जर एमआयएम पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभे असते तर आज निलेश राणे यांची अशी भाषा वापरण्याची हिंमत झाली नसती. पण ठीक आहे, आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निलेश राणे यांच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. त्यांचं थुंकणं तर दूरच आम्ही एमआयएमवाले नुसते फुंकली तरी राणे बंधू हवेत उडून जातील, असा टोलाही शाब्दि यांनी नितेश राणे आणि निलेश राणे यांना लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.