MNS Chief Raj Thackeray's visit to Ayodhya postponed? Raj Thackeray's Ayodhya Visit, Raj Thackeray News, MNS News Saam Tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तुर्तास स्थगित

Raj Thackeray : राज ठाकरे 5 जूनला अध्योध्येला जाणार होते

साम टिव्ही ब्युरो

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या ५ जूनला अयोध्या (Ayodhya) दौऱ्याला जाणार होते. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे 5 जूनला अध्योध्येला जाणार होते. मात्र, त्यांच्या हा दौरा काही कारणामुळे स्थगित करण्यात आलाय. स्वत: राज ठाकरे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (MNS Raj Thackeray Ayodhya Tour Postponed)

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन आता राजकारण चांगलंच तापायला लागले होते. येत्या 5 जूनला राज ठाकरे अयोध्या (Ayodhya) दौरा करणार होते. मात्र, त्यांच्या दौऱ्याला उत्तरप्रदेशचे भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी जोरदार विरोध केला होता. 'राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी त्यानंतरच अयोध्येत पाय ठेवावा' अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली होती.

दुसरीकडे बृजभूषण सिंह यांनी विरोध दर्शवल्यानंतर मनसे सुद्धा आक्रमक झाली होती. 'राजसाहेब ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर, संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल,' अशा स्वरुपाचे बॅनर मुंबईत लावण्यात आले होते. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या आणि या दौऱ्यावरून त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना मनसैनिकांनी हा इशारा दिला होता.

दरम्यान, आज सकाळपासून राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलला जाणार असल्याची चर्चा रंगली होती. अखेर आता प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत आपला दौरा स्थगित करण्यात आल्याचं जाहीर केलं आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या पायाला झालेल्या दुखापतीचा त्रास गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे हे पुणे दौरा अर्धवट दौरा सोडून मुंबईत आले. डॉक्टरांकडून राज ठाकरे यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, ही शस्त्रक्रिया कधी करायची याबाबत निर्णय राज ठाकरे घेणार आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father shot: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर झाडल्या गोळ्या; २ तरुणांनी केला हत्येचा प्रयत्न

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

SCROLL FOR NEXT