Bhandara Political News  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: स्थानिक नेत्यांनी माझा घात केला, भाजपच्या बड्या नेत्याचा राजीनामा; ढसाढसा रडत म्हणाले...

Bhandara Political News: भंडाऱ्यामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या बड्या नेत्याने राजीनामा दिला. माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

Priya More

Summary -

  • भंडारा जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का

  • भाजप नेते प्रदीप पडोळे यांनी सर्व पदांचा दिला राजीनामा

  • राजीनामा देताना ते भावुक झाले

  • स्थानिक नेत्यांनी माझा घात केला, असा गंभीर आरोप त्यांनी केला

शुभम देशमुख, भंडारा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या जोरदार तयारी सुरू आहेत. अशात राज्यातील राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे. अनेक पक्षांचे बडे नेते पक्षांची साथ सोडत दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत.

हे इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू असतानाच भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. भंडाऱ्यामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. स्थानिक नेत्यांनी माझा घात केला असा गंभीर आरोप करत भाजपच्या एका बड्या नेत्याने राजीनामा दिला आहे. पत्रकार परिषद घेत ते ढसाढसा रडले आणि त्यांनी राजीनामा देण्यामागचं कारण सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे तुमसर मोहाडी विधानसभा प्रमुख, प्रदेश कार्यकारणी सदस्य, माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला. राजीनामा दिल्यानंतर माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे भावुक झाले. डोळ्यातून अश्रू काढत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

'यापुढे मी फक्त पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. स्थानिक नेत्यांनी आपला घात केला. जातीवादी, परिवारवाद अशा प्रकारचे आरोप चुकीचे आहेत.', असे प्रदीप पडोळे यांनी सांगितले. प्रदीप पडोळे यांनी राजीनामा दिल्याच्या या निर्णयामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यामध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे.

दरम्यान, भंडाऱ्यामध्ये एकीकडे माजी नगाराध्यक्षांनी राजीनामा दिला. तर दुसरीकडे माजी आमदार बाळा काशीवार यांनी भाजपमध्ये घरवापसी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार परिणय फुकेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यांच्या घरवापसीमुळे भंडाऱ्यात भाजपची ताकद वाढली असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; धडकेनंतर कारनं घेतला पेट, व्हिडिओ व्हायरल

Indurikar Maharaj Daughter Royal Engagement: मुलीचं शाही लग्न, बोला इंदुरीकर काय करायचं?

Free Bike For Aadhaar Card Holders: आधारकार्ड असलेल्यांना मिळणार फ्री बाईक? केंद्र सरकारची फ्री बाईकची योजना?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात काँग्रेसच्या हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT