Vote Scam Storm: भाजपच्या मित्रांचाही व्होट चोरीचा आरोप, व्होट चोरीवर भाजपचे मित्र विरोधकांसोबत?

Maharashtra Elections: व्होटचोरीवर विरोधकांनी वज्रमूठ आवळली असताना भाजपला मोठा धक्का बसलाय. कारण विरोधकांच्या सूरात महायुतीतील मित्र पक्षांचाही सूर मिसळला आहे. शिंदे सेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही मतदारयाद्यांमधील घोळावर बोट ठेवलं आहे
BJP allies Hasan Mushrif and Sanjay Shirsat join opposition voices over alleged voter list fraud in Maharashtra.
BJP allies Hasan Mushrif and Sanjay Shirsat join opposition voices over alleged voter list fraud in Maharashtra.Saam Tv
Published On

मतदारयाद्यांमधील घोळ उघड केल्यानंतर विरोधकांनी सत्याचा मोर्चा काढून निवडणूक आयोगावर दबाव वाढवलाय. बोगस मतदारांच्या मदतीनेच सत्ता मिळवल्याचा आरोप विरोधकांनी महायुतीवर केलाय. त्यात आता भाजपच्याच मित्र पक्षांनीही व्होटी चोरीच्या मुद्यावर विरोधकांच्या सुरात सूर मिसळलाय. त्यामुळे भाजपची अडचण झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीतले मंत्री हसन मुश्रीफ यांनीच हे आरोप केले आहेत.

काही दिवसांपूर्वी शिंदेसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनीही चार हजार बोगस मतदार असल्याची तक्रार करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. अगदी दिल्ली ते गल्लीपर्यंत व्होट चोरीचा मुद्दा तापला आहे. मात्र पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महायुतीतील मित्र पक्षांनीही विरोधकांच्या बरोबरीने त्यांची री ओढणे भाजपसाठी अडचणीचे ठरु शकते.

अनेक मुद्यांवरून महायुतीतली धुसफूस लपून राहिलेली नाही. आता व्होट चोरीच्या मुद्यावरून महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. यामुळे मात्र विरोधकांच्या आरोपांना बळ मिळालंय एवढं नक्की....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com