Lonar Lake Saam Tv
महाराष्ट्र

Lonar Lake : जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाणी पातळीत मोठी वाढ; काय आहे कारण?

सरोवरातील पाच पुरातन मंदिरे पाण्यात

संजय जाधव

Buldhana News : बुलढाण्यातील (Buldhana) जगप्रसिद्ध अशा लोणार सरोवराच्या पाणी पातळीत तब्बल चौदा वर्षांनी मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे लोणार सरोवरातील (Lonar Lake) पाच पुरातन मंदिरे पाण्यात गेली आहे. पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने लोणार सरोवर अभ्यासकांना आता चिंता सतावू लागली आहे.

लोणार हे जगातील प्रसिद्ध सरोवर आहे.  बेसॉल्ट खडकात असलेला जगातील एकमेव व उल्कापिंडा मुळे तयार झालेला खाऱ्या पाण्याचा जगातील दुसरा सर्वात मोठा सरोवर आहे. जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत 14 वर्षानंतर मोठी वाढ झालेली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे लोणार सरोवर परिसरात असलेल्या पाच मंदिरांना पाण्याने वेढा दिलेला आहे. (Latest Maharashtra News)

यावर्षी बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाळा झालेला आहे. त्यामुळे लोणार सरोवरात असलेले झरे हे प्रवाहित झालेले आहेत. जवळपास चौदा वर्षानंतर अनेक झरे हे डिसेंम्बर महिन्यात अजूनही वाहत आहेत. त्यामुळे लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने सरोवरातील पाच पुरातन मंदिरे पाण्यात गेली आहे. आधीच या मंदिराची अवस्था जीर्ण झाली आहे आणि पुरातत्व विभाग याकडे लक्ष देत नसल्याचं येथील अभ्यासकांच म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT