Weight Loss Medicine yandex
महाराष्ट्र

Weight Loss: नवीन वर्षात फार्मा क्षेत्रात मोठे विस्तार, वजन कमी करणारी गोळी होणार उपलब्ध

Weight Loss Pills: वजन कमी न करता मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, आणि गुडघेदुखी यांसारख्या विकारांचा धोका वाढतो. दरम्यान आता आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

Dhanshri Shintre

नवीन वर्षात आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. खासगी रुग्णालये तसेच महापालिका आणि सरकारी रुग्णालयांत पायाभूत सुविधांचा विकास आणि आरोग्य सेवा विस्तार केला जाणार आहे. याशिवाय, फार्मा कंपन्या वजन कमी करणाऱ्या गोळी आणि इंजेक्शनचे अधिकृत लॉन्च करणार आहेत, ज्यामुळे लठ्ठपणाशी संबंधित असलेल्या अनेक आजारांवर उपचार मिळण्याची संधी निर्माण होईल. वजन कमी न करता मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, आणि गुडघेदुखी यांसारख्या विकारांचा धोका वाढतो. या औषधांमुळे नागरिकांना अधिक आरोग्यदायी जीवनशैली मिळविण्यात मदत होईल.

रोबोटिक सर्जरी हा एक खर्चीक उपचार पद्धती आहे, ज्याचा उपयोग विशेषतः खासगी रुग्णालयांमध्ये केला जातो. या शस्त्रक्रियांमध्ये उच्च तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने त्यांचा खर्च सामान्य रुग्णांसाठी परवडणारा नसतो. पण, गरीब रुग्णांसाठी या प्रकारच्या उपचारांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जे. जे. रुग्णालयात नवीन वर्षात रोबोटिक सर्जरी सुरू केली जाणार आहे. यासाठी, वैद्यकीय शिक्षण विभागाने ३२ कोटी रुपयांचा खर्च करून एक अत्याधुनिक रोबोट खरेदी केला आहे, ज्यामुळे गरीब रुग्णांना परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाची शस्त्रक्रिया मिळवता येईल.

जे. जे. रुग्णालय परिसरात सुरू असलेल्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतींचे बांधकाम नव्या वर्षात पुढे जाईल. या इमारतीतील काही भाग २०२५ मध्ये कार्यान्वित होणार आहेत. इमारत दोन मजली तळघरासह, तळमजला आणि अधिक दहा मजले असलेल्या स्थापत्याने तयार होईल, ज्याचा प्रत्येक मजला १ लाख चौरस फुटांचा असेल. इमारतीला चार मुख्य विंग्स - ए, बी, सी, डी असे असतील. यापैकी दोन विंग्स नव्या वर्षात सुरू होईल, ज्यामुळे रुग्णालयातील बेडची क्षमता २,३५० पर्यंत वाढवली जाईल.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील २५ वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये सध्या रुग्णांची माहिती हाताने लिहिण्यात येते. त्यासाठी कॉलेजना कॉम्प्युटर दिले असले तरी, आवश्यक असलेले लोकल एरिया नेटवर्क, इंटरनेट आणि डेटा ऑपरेटर नसल्यानं रुग्णालयांतील डिजिटल रुग्ण नोंदणी सुरू होऊ शकलेली नाही. मात्र, विभागाने सांगितले आहे की नव्या वर्षात डिजिटल रुग्ण नोंदणीचा प्रारंभ करण्यात येईल.

खासगी रुग्णालयांमध्ये आयव्हीएफ उपचारांसाठी लागणारा खर्च लाखोंच्या घरात असतो, परंतु आता महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये हे उपचार अत्यंत कमी खर्चात उपलब्ध होणार आहेत. सायन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक आयव्हीएफ सेंटर उभारले गेले असून, ते नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात कार्यरत होईल. तसेच, कामा रुग्णालयातही याच वर्षी आयव्हीएफ उपचार सुरू होणार आहेत. यामुळे अधिक लोकांना परवडणाऱ्या दरात आयव्हीएफ उपचार मिळू शकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT