Local Body Election Saam Tv
महाराष्ट्र

Holiday In Maharashtra: २ डिसेंबरला मिळणार भरपगारी सुट्टी, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. २ डिसेंबरला भरपगारी सुट्टी मिळणार आहे. पगारी सुट्टी किंवा पुरेसा वेळ न दिल्यास आस्थापनांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

Priya More

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला. २ डिसेंबरला नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी नागरिकांना मतदान करता यावे यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला. २ डिसेंबरला पगारी सुट्टी मिळणार आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील विविध अस्थापने, व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी सरकारने जाहीर केली आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. या निवडणुकांचा पहिला टप्पा येत्या २ डिसेंबरला पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या शासकीय निर्णयानुसार महाराष्ट्र सरकारने २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी संबंधित जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांसाठी पगारी सार्वजनिक सुट्टी (Paid Holiday) जाहीर केली आहे.

ज्या जिल्ह्यांमध्ये २ डिसेंबर म्हणजे मंगळवारी मतदान होणार आहे. त्या जिल्ह्यांतील कर्मचारी, अधिकारी आणि कामगार या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पगारी सुट्टी देण्यात आली आहे. उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाकडून सांगण्यात आले आहे की, मागच्या वेळी झालेल्या निवडणुकांमध्ये काही आस्थापनांनी पगारी सुट्टी किंवा कामातून वेळ दिला नाही. त्यामुळे अनेकांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले होते. यावेळी तसं घडू नये आणि सर्व पात्र नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील याची खात्री करण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ मधील तरतुदीनुसार मतदानाच्या दिवशी मतदारांना पगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे. ही सुट्टीची अट त्या सर्व कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी लागू असते जे मतदान क्षेत्रातील मतदार आहेत. त्यांचे कामाचे ठिकाण मतदारसंघाच्या आत असो वा बाहेर तरी देखील त्यांना सुट्टी देणे बंधनकारक आहे. कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना, ज्यात कारखाने, दुकाने, हॉटेल्स, व्यावसायिक आस्थापने, आयटी कंपन्या, मॉल्स आणि किरकोळ विक्री केंद्रे यांचा समावेश आहे. या सर्वांना निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यांना कामगारांना भरपगारी सुट्टी द्यावी लागणार आहे. जर नियम पाळले नाही तर कारवाई केली जाऊ शकते. पगारी सुट्टी किंवा पुरेसा वेळ न दिल्यास आणि याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT