सीबीएईने विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे.विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळवता यावे यासाठी नवे नियम लागू होणार आहेत. विद्यार्थ्यांना जास्त गुणांसाठी १० बोर्डाची परीक्षा दोनदा देता येणार आहे...काय आहेत हे नवे नियम
इयत्ता दहावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा महत्त्वाचा टप्पा....अशा या महत्त्वाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांना उत्तम गुण मिळवण्यासाठी दोन पर्याय देण्याचा मोठा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतलाय....या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून होणार आहे...या संदर्भातल्या मसुदा तयार असून त्यावर सुधारणा मागवण्यात आल्यात....सुधारणा करून नव्या नियमांचा मसूदा लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे...
सीबीएसई दहावी परीक्षेचा पहिला टप्पा १७ फेब्रुवारी ते ६ मार्च पर्यंत असेल आणि दुसरा टप्पा ५ मे ते २० मे असा असेल....
या दोन्ही परीक्षा पाठ्यपुस्तकावर आधारीत असणार..आहेत..सर्व विद्यार्थी दोन्ही परीक्षा देऊ शकतील तसंच अर्ज भरतानाच दोन्ही परीक्षांसाठीचे शुल्क भरावे लागेल...आणि दोन्ही परीक्षांसाठी परीक्षा केंद्र सुद्धा एकच ठेवण्यात येईल....
नवे नियम
वर्षातून एकदा परीक्षेला बसण्याचा किंवा दोन्ही परीक्षा देण्याचा पर्याय
पहिल्या-दुसऱ्या परीक्षेत सर्व विषयांची परीक्षा देणं आवश्यक नाही
दोन्ही परीक्षा दिल्यास सर्वोत्तम गुण अंतिम मानले जातील
चांगले मार्क न आल्यास तोच विषय दुसऱ्यांदाही देता येईल
विविध कारणांने विदयार्थ्यांना परिक्षा देता आली नाही तर पुढची संधी थेट ऑक्टोबरमध्ये मिळते आणि त्यांचे महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष वाया जाते.आता हा हा निर्णय अंतिम झालाच तर अनेक विद्यार्थ्यांचे वाया जाणारे शैक्षणिक वर्ष वाचेल की सर्वोत्तम गुणांच्या पर्यायामुळे या निर्णयाचा गैरफायदा घेतला जाईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.