Uddhav Thackeray Saam tv
महाराष्ट्र

Election : महापालिका निवडणुकीआधी शिंदेंचा ठाकरेंना मोठा धक्का, १६ बड्या नेत्यांनी केला जय महाराष्ट्र

Akola political news : अकोला शहरात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं भगदाड पडलेय. महानगरप्रमुख आणि मावळत्या महापालिकेतील गटनेते राजेश मिश्रांसह चार नगरसेवक आणि अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Akola Shiv Sena leaders join Eknath Shinde shiv sena : अकोल्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा झटका बसलाय. पक्षाचे महानगर प्रमुख आणि मावळत्या महापालिकेतील गटनेते राजेश मिश्रांसह चार नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. नागपुरातील एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या 'देवगिरी' शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडलाय. राजेश मिश्रा यांच्यासह नगरसेवक गजानन चव्हाण, अनिता मिश्रा आणि प्रमिला गीते या नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.

यासोबतच काही माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तरुण बगेरे यांनीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. राजेश मिश्रा यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला अकोला शहरात मोठं खिंडार पडलंय. तर मिश्रांच्या पक्षप्रवेशाने शिंदे यांच्या शिवसेनेला शहरात मोठं बळ मिळालंय. मावळत्या अकोला महापालिकेतील 8 पैकी 6 नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.

राजेश मिश्रा यांचे कुटुंबीय गेल्या 40 वर्षांपासून अकोला महापालिकेच्या राजकारणात आहेय. मिश्रा यांचे वडील, आई, ते स्वत:, पत्नी आणि वहिनी हे महापालिकेत नगरसेवक राहिलेयेत. राजेश मिश्रा यांनी 2024 ची निवडणूक अकोला पश्चिम मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढवत अडीच हजारा़पर्यंत मतं घेतली होतीय. त्यांच्यामुळेच अकोला पश्चिम मतदारसंघात भाजप उमेदवाराचा 1283 मतांनी पराभव झाला होताय. त्यामुळे राजेश मिश्रांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे महायुतीतील भाजपचे स्थानिक नेते यावर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.

कोणकोणत्या नेत्यांनी केला जय महाराष्ट्र

१)राजेश कृपाशंकर मिश्रा (शिवसेना शहरप्रमुख तथा गट नेते मनपा अकोला)

२) सौ अनिताताई राजेश मिश्रा (नगरसेविका)

३)गायत्रीदेवी कृपाशंकर मिश्रा (माजी नगरसेविका)

४)गजानन उत्तमराव चव्हाण ( नगरसेवक)

५) सौ प्रमिलाताई पुंडलिकराव गीते ( नगरसेविका)

६) सौ राजकुमारी राजकुमार मिश्रा (माजी नगरसेविका)

७)तरुण जगदीश बगेरे (उपजिल्हा प्रमुख)

८)नितीन रमाशंकर मिश्रा (युवा सेना शहर प्रमुख)

९)संजय रतनलाल अग्रवाल ( उपशहर प्रमुख )

१०) अंकुश जी शिंत्रे ( उपशहर प्रमुख)

११)रुपेश ढोरे (विभाग प्रमुख)

१२)राजेश इंगळे (विभाग प्रमुख)

१३)मुन्ना भाऊ उकर्डे (विभाग प्रमुख)

१४)श्याम भाऊ रेळे (विभाग प्रमुख)

१५)चेतन राजेंद्र मारवाल (सोशल मीडिया समन्वयक)

१६)योगेश पुंडलीकराव गीते (प्रसिद्धी प्रमुख)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

"माझ्या पतीच्या हत्येचा खटला संथ गतीने सुरू आहे, म्हणून..." भाजप पक्षप्रवेशावेळी तेजस्वी घोसाळकर काय म्हणाल्या? VIDEO

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेच्या ३ हजार ६२ कोटींच्या कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन

१९ मिनिटांच्या MMS व्हिडिओनंतर ५ मिनिट ३९ सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल, AI की MMS खरा?

धक्कादायक! बापाने ५ मुलांसोबत गळफास घेतला, ३ मुलींसह चौघांचा मृत्यू,२ मुलांनी जीव वाचवून पळ काढला

Cancer Test: या ४ टेस्ट शोधून काढतील तुमच्या शरीरातील कॅन्सरच्या पेशी; वेळेत निदान होणं गरजेचं

SCROLL FOR NEXT