Ratnagiri Politics Saam Tv
महाराष्ट्र

Ratnagiri Politics : मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच रत्नागिरीत शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश

CM Shinde News : गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटातून शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात वेगळं चित्र पहायला मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जितेश कोळी

Ratnagiri News : गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटातून शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे. ठाकरे गटातील आणखी काही आमदार शिंदे गटात येणार असल्याचा दावा देखील शिंदे गटातील नेते करताना दिसतात. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात वेगळं चित्र पहायला मिळत आहे. दापोलीमध्ये ठाकरे गटाने शिंदे गटाला जोरदार धक्का दिला आहे. (Latest Marathi News)

शिंदे गटाचे आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांचे कट्टर समर्थक आणि दापोली (Dapoli) नगपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुसाळकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटात प्रवेश केला आहे. हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दापोली नगपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुसाळकर हे आमदार योगेश कदम यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

मात्र कुसाळकर यांनी आता ठाकरे गटात प्रवेश केल्यानं हा शिंदे गटासोबतच योगेश कदम यांच्यासाठी देखील मोठा धक्का मानला जात आहे. कुसाळकर यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यापूर्वी देखील ठाकरे गटाने जिल्ह्यात शिंदे गटाला धक्के दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stray Dogs : पुण्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, दिसेल त्याचे तोडले लचके, चिमुरड्यासह १० जण जखमी

Maharashtra Live News Update: पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा शहरात पाहणी दौरा

Heart artery blockage signs: हार्ट वेन्स ब्लॉक झाल्यास शरीरात दिसतात 'हे' बदल; चुकूनही या रेड फ्लॅग्सकडे दुर्लक्ष करू नका

धाराशिवहून मुंबई फक्त ५ तासात, महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, वाचा सविस्तर माहिती

Viral Video: बैलपोळा उत्सवात बैल उधळला; शेतकऱ्यांची पळापळ अन् पुढे काय घडलं ते पाहाच

SCROLL FOR NEXT