Bachchu Kadu News
Bachchu Kadu NewsSaam Tv

Bachchu Kadu News : सध्या शिंदे सरकारला पाठिंबा, युतीबाबत अद्याप निर्णय नाही; बच्चू कडूंचे सूचक वक्तव्य

Maharashtra Politics : बच्चू कडू यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Published on

अमर घटारे

Amravati News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप आणि शिंदे गटातील जागा वाटपाबाबत मोठं वक्तव्य केलं. भाजप 288 पैकी 240 जागा लढवणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे शिंदे गटाला केवळ विधानसभेच्या केवळ 48 जागाच मिळणार असल्याचं दिसून येत आहे. बावनकुळे यांच्या या विधानामुळे शिंदे गटात एकच चलबिचल सुरू झाली आहे. आता या मुद्द्यावर आमदार बच्चू कडू यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

Bachchu Kadu News
Ramdas Kadam : उद्धव ठाकरेंवर रामदास कदमांची टोलेबाजी; म्हणाले,'ते इथे सभा घ्यायला अफझल खानासारखे आले...'

भारतीय जनता पक्षाने (BJP) नुकताच युतीचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. मात्र यात शिंदे आणि भाजप सरकारला पाठिंबा देणाऱ्या लहान पक्षांचा उल्लेख नाही. आम्ही सध्या शिंदे सरकारला पाठिंबा दिलेला आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये युती करायची की नाही करायची, आम्हाला किती जागा देणार त्याचं अजून काही ठरलेलं नाही असे बच्चू कडू म्हणाले.

कोणी किती जागा लढवायच्या हा शिवसेना आणि भाजपचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आमची शिंदे गट आणि भाजपशी युती नाही. आमचा फक्त सरकारला पाठिंबा आहे. जेव्हा युती होईल तेव्हा पाहू, असं बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले.

Bachchu Kadu News
Accident News : मोठी बातमी! मुंबईहून बेंगलोरच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला भीषण अपघात; गर्भवती महिलेसह 6 प्रवाशी जखमी

बावनकुळे यांनी केलेलं वक्तव्य हे खरे आहे की चुकून त्यांचे शब्द निघाले हे पण तपासलं पाहिजे. पण आम्ही सध्या शिंदे सरकारला पाठिंबा दिलेला आहे युतीच अजून काही आमचं ठरलं नाही ते येणारा काळ पाहून ठरवू असे सुचक विधान बच्चू कडू यांनी केले आहे. ते अमरावती येथे बोलत होते.

बच्चू कडू पुढे म्हणाले, पुढल्या दीड वर्षात काय होते त्याचे आता काहीच सांगता येत नाही, या पाच वर्षात तीन मुख्यमंत्री बदलले, तीन वेळा शपथविधी झाले पुढल्या दीड वर्षात काय होणार हे सांगता येत नाही असे सूचक वक्तव्य केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com