Big blow to Eknath Shinde Vaijapur MLA Ramesh Bornare resign for Maratha reservation demand Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation: शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का; आरक्षणासाठी मराठवाड्यातील आमदाराचा राजीनामा

Eknath Shinde Group Mla Resign: शिवसेना शिंदे गटाचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

Satish Daud

Eknath Shinde Group Mla Resign

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. आरक्षणाची मागणी करत मराठा संघटनांकडून राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. आंदोलकांकडून होणारी कोंडी बघता, काही खासदार आणि आमदारांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच शिंदे गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाची मागणी करत एका आमदाराने राजीनामा दिला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिंदे गटाला दुसरा मोठा धक्का

शिवसेना शिंदे गटाचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे बोरणारे यांनी राजीनाम्याचं पत्र दिल्याची माहिती आहे. शिंदे गटाला बसलेला हा दुसरा मोठा धक्का आहे.

यापूर्वी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आरक्षणासाठी राजीनामा दिला होता. हेमंत पाटील यांच्या राजीनाम्याची बातमी ताजी असतानाच आता वैजापूर मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांनी राजीनामा दिला आहे. अजूनही काही आमदार राजीनामा देण्याच्या तयारी असल्याचं सूत्रांनी साम टीव्हीला सांगितलं आहे.

बीडमध्ये भाजप आमदाराचा राजीनामा

मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन भाजप आमदाराने देखील राजीनामा दिला आहे. बीडच्या गेवराई मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. “महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत. या मराठा आरक्षणासाठी माझा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे”, असं लक्ष्मण पवार यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं आहे.

परभणीत काँग्रेस आमदाराचा राजीनामा

काँग्रेसचे परभणीतील आमदार सुरेश वरपुडकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. वरपुडकर हे पाथरी मतदार संघातील आमदार आहेत.राजीनाम्याबाबत वरपुडकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहलं आहे. मराठा, धनगर व मुस्लीम आरक्षणासाठीमी विधान सभा सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, आपण माझा राजीनामा स्वीकारावा, अशी विनंती वरपुडकर यांनी विधानसभा अध्यक्षांना केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT