devendra fadnavis  x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : काँग्रेसचा गड ढासळला! सांगलीच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, भाजपमध्ये करणार प्रवेश

Sangli Congress district chief Prithviraj Patil joins BJP before local polls : सांगली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि सांगलीतील राजकीय परिस्थितीमुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

Ganesh Kavade, Namdeo Kumbhar

  • सांगली काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा.

  • स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का.

  • गेल्या काही दिवसांत काँग्रेसमधून अनेक नेते भाजपमध्ये दाखल.

Big Blow to Congress in Sangli: मागील काही दिवसांपासून सांगलीमध्ये काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत. सांगली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. आज ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पृथ्वीराज पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान, सांगलीच्या माजी महापौर कांचन कांबळे, खासदार विशाल पाटलांचे कट्टर समर्थक मनोज सरगर आणि नगरसेविका शुभांगी साळुंखे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामधून सावरण्याआधीच सांगलीत काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.

पृथ्वीराज पाटलांचा काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा

भाजपा प्रवेश निश्चित झाल्यावर सांगलीचे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आपल्या पदासह काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शहर जिल्हाध्यक्ष पदासह काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा पाटील यांनी काँग्रेस पक्षाकडे पाठवला आहे. आज मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप पक्ष प्रवेश देखील निश्चित मानला जात आहे. सोमवारी सांगलीमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात जाण्याचा निर्णय पृथ्वीराज पाटील यांच्याकडून घेण्यात आला होता.त्यानंतर पृथ्वीराज पाटलांनी आपल्या काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे, त्यामुळे आज मुंबईत पृथ्वीराज पाटलांचा भाजप प्रवेश होणार आहे.

कोण आहेत पृथ्वीराज पाटील?

2014 मध्ये त्यांच्याकडे काँग्रेसच्या सांगली जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

देशासह राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर अडचणीच्या काळात त्यांनी सांगलीचा किल्ला नेटाने लढवला

सांगलीत काँग्रेसला जिवंत ठेवण्यासाठी संपूर्ण ताकद लावली. रस्त्यावरची लढाईही केली.

महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात त्यांनी सांगली सिव्हिलसह विविध विकास कामांसाठी निधी खेचून आणला

ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि विशाल पाटील यांना जोरदार धक्का बसला आहे. पुढील काही दिवसांत सांगलीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, त्याआधीच काँग्रेसचा किल्ला ढासळला आहे. पृथ्वीराज पाटील यांची जिल्ह्यावर मोठी पकड होती, त्यांचा भाजपला जोरदार फायदा होणार आहे. दुसरीकडे सांगलीमध्ये काँग्रेसला गळती लागली आहे. गेल्या काही दिवसांत अनेक दिग्गजांनी काँग्रेसला हात दाखवत भाजपात प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Tendulkar Son : सचिनचा मुलगा अर्जुनचा साखरपुडा झाला; कोण आहे तेंडुलकर घराण्याची होणारी सून?

Bank Charges: महत्त्वाची बातमी; आता बँक व्यवहारांवर आकारणार शुल्क, कधीपासून लागू होणार नियम?

Mumbai High Court: कबुतरखान्यावरून मराठीविरुद्ध जैन; हायकोर्टाकडून बंदी कायम

Adult Video: शाळेत वर्ग सुरू असतानाच एलईडी स्क्रीनवर लागला पॉर्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Hair Care Tips: आठवड्यातून केसांना कितीवेळा तेल लावावे?

SCROLL FOR NEXT