Beed Crime News  Saam TV
महाराष्ट्र

Beed News : लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; बीड पोलिसांची मोठी कारवाई

भरदिवसा लूटमार करणाऱ्या टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केलाय.

विनोद जिरे

Beed Crime News : भरदिवसा लूटमार करणाऱ्या टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केलाय. दुचाकीवर जाणाऱ्या बँकेच्या कर्मचाऱ्याला, दुचाकी आडवी लावून लुटल्याचा प्रकार गेवराई परिसरात घडला होता. यातील आरोपी असणाऱ्या 3 जणांच्या टोळीला पकडण्यात पोलिसांना मोठं यश आलंय. (Beed Todays News)

याविषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून, 26 ऑगस्ट रोजी आयडीएफसी बँकेचे कर्मचारी सुदर्शन शिवाजी आघाव, हे पाचेगाव येथून महिला बचतगटांना दिलेल्या कर्जाचे हफ्ते वसुली करुन गेवराईकडे जात होते. या दरम्यान सर्व्हिस रोडवर असताना पाठीमागून एक प्लसर गाडीवर दोघांनी चाकुचा धाक दाखवून सुदर्शन यांच्या जवळील, 95 हजार 610 रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन पसार झाले. (Beed Police Latest News)

याप्रकरणी बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अवघ्या 4 दिवसात, बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने, आनंद सुंदर ससाणे रा पंचशील नगर बीड, या मुख्य आरोपीसह त्याचे साथीदार असणाऱ्या, आकाश प्रकाश धुताडमल रा. टाकळगाव ता. गेवराई, आकिल इस्माईल शेख रा. आहेर वाहेगाव ता. गेवराई या तिघांना जेरबंद केलंय.

दरम्यान या टोळीला पकडल्याने बीड जिल्ह्यातील मोठं मोठे लुटमारीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SIP Calculation: दर महिन्याला ₹६,००० गुंतवा अन् ₹५ लाख मिळवा, SIP कॅल्क्युलेशन एकदम सोप्या भाषेत

Maharashtra Live News Update : नाशिक परिसरातील गोळीबार प्रकरणी माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक

Fitness Tips: फिट राहायचंय? वय आणि जेंडरनुसार किती करावेत पुशअप्स?

Banjara ST Category Demand: बंजारा समाजाच्या मागणीवरून वातावरण तापलं, नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा महामोर्चा, VIDEO

EPFO News : निवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी धुमधडाक्यात! किमान पेन्शन २५०० रुपयांनी वाढण्याची शक्यता, कुणाला मिळणार फायदा?

SCROLL FOR NEXT