स्व.बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुलाचे देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन
स्व.बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुलाचे देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन गजानन भोयर
महाराष्ट्र

स्व.बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुलाचे देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन

गजानन भोयर

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकाच छताखाली शेती विषयक सर्वकाही माहिती मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत कृषी संकुलाची उभारणी केली जाणार आहे.

हे देखील पहा -

वाशिम शहरातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या बाजूला उभारण्यात येणाऱ्या अद्ययावत स्व.बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुलाचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार भावना गवळी यांच्या हस्ते पार पडले. या ई-भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषि मंत्री दादाजी भुसे दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

दरम्यान जवाहर नवोदय विद्यालयाच्या बाजूला काटा रोड परिसरातील १.६० हेक्टर जागेवर स्व.बाळासाहेब ठाकरे बहुद्देशीय कृषि संकुलाची उभारणी केली जाणार आहे. याकरिता नियोजन विभागाच्या माध्यमातून ५ कोटी ४४ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. पश्चिम विदर्भातील हे वाशिम जिल्ह्यात संकुल उभे राहणार असल्याने वऱ्हाडातील कोरडवाहू शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Pune: आनंदाची बातमी ! पुण्यात घर घेण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण

Mumbai Goa Highway News | झाड कोसळलं, वाहतूक खोळंबली! मुंबई गोवा महामार्ग ठप्प

Ajit Pawar News | ठाकरे आणि मोदींच्या सभेला अजित पवार उपस्थित राहणार?

Narendra Modi Mumbai Road Show | मोदींचा रोड शो अजितदादांची दांडी! कारण शंभूराज देसाईंनी सांगितलं

Chhatrapati Sambhajinagar Farmer Protest | सरकार जरा या शेतकऱ्यांकडे लक्ष देईल का?

SCROLL FOR NEXT