वृद्धेचा पुतण्याकडून कर्नाटकात नेऊन खून
वृद्धेचा पुतण्याकडून कर्नाटकात नेऊन खूनविजय पाटील

वृद्धेचा पुतण्याकडून कर्नाटकात नेऊन खून

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी येथील वृद्धेचा तिच्याच पुतण्याने कर्नाटकातील कोलार येथे नेऊन कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Published on

सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी येथील वृद्धेचा तिच्याच पुतण्याने कर्नाटकातील कोलार येथे नेऊन कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुशिलाबाई राजाराम माने वय ७४ असे मृत महिलेचे नाव असून, त्यांचा पुतण्या संशयित आरोपी दादासाहेब माने हा फरारी आहे.

हे देखील पहा -

सुशिलाबाई माने यांना गुरुवारी सायंकाळी पुतण्या दादासाहेब माने याने भाड्याच्या मोटारीतून विजापूर येथे नेले. सोबत मोटरचालकही होता. दादासाहेबने विजापूरमध्ये एक कोयता विकत घेतला आणि पुढे कोलार येथे उतरून सुशिलाबाई यांना पाहुण्याच्या घरी सोडून येतो. असे चालकाला थांबवून तो गेला. त्यानंतर दोन तासांनी तो परत आला. सुशिलाबाई यांना पाहुण्याच्या घरी सोडून आलो असे त्याने चालकाला सांगितले. मात्र त्याच्या शर्टाच्या वर रक्ताचे डाग पडल्याचे दिसून आल्याने त्याला संशय आला. त्याने परत आल्यावर चडचण येथील पोलिसांना माहिती दिली.

वृद्धेचा पुतण्याकडून कर्नाटकात नेऊन खून
OLA S1 इलेक्ट्रिक स्कूटर अखेर भारतात लॉंच, जाणून घ्या किंमत

दरम्यान सुशिलाबाई यांच्या जत येथील जावयाने त्या बेपत्ता झाल्याची तक्रार उमदी पोलिसांत दिली होती. उमदी पोलिसांनी माग काढला. मोटरचालकला बोलावून घेऊन चौकशी केली. त्यानंतर शनिवारी कर्नाटकातील कोलार येथे जाऊन शोध घेतला असता, सुशिलाबाई माने यांचा मृतदेह उसाच्या फडात सापडला. त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याचे दिसून आले. संशयित दादासाहेब माने हा फरार झाला आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर खुनाचे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com