Bhiwandi Crime  Saam Tv
महाराष्ट्र

Pakistan: 'काही पण होऊ द्या पाठिंबा फक्त...', तरुणाला पाकिस्तानचा पुळका, पोलिसांनी शिकवला धडा

India - Pakistan War: भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानविरोधात भारताने मोठी कारवाई करत त्याला धडा शिकवला. अशामध्ये भिवंडीतील तरुणाने पाकिस्तानचे समर्थन केले. त्याच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली.

Priya More

पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवला. ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. या कारवाईनंतर एकीकडे सर्व भारतीय सैन्य दलाचे कौतुक करत आहेत. भारताने अखेर बदला घेतला त्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. अशातच भिवंडीमधील एका तरुणाला पाकिस्तानचा पुळका आला. त्याने सोशल मीडियावर पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट केली. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या तरुणाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील एका तरुणाने इन्स्टाग्राम स्टोरीवर पाकिस्तानचे समर्थन केल्याची पोस्ट केली. त्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. भिवंडी शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अफसर अली अजगर अली शेख (१८ वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

बुधवारी भारतीय सैन्याने पाकिस्तानी अतिरेक्यांवर कारवाई केली. त्याचे संपूर्ण देशवासीयांकडून स्वागत करीत बदला घेतल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला जात आहे. अशात भिवंडीमधील अफसर अली अजगर अली शेख या तरुणाने इन्स्टाग्राम स्टेटसवर 'चाहें जो हो जाये सपोर्ट तो बस पाकिस्तान को करेंगे', असा देशविरोधी संदेश ठेवला होता. ही बाब राष्ट्रप्रेमी नागरिकांना समजताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत देशद्रोही तरुणाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिस कर्मचारी शैलेश भोसले यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आरोपी युवकास रात्री उशिरा ताब्यात घेतले. त्याविरोधात भा.न्या.सं. कलम १५२ प्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं, गर्भवती महिलेने चिमुकलीसह विहिरीत मारली उडी

Crime: संसारात ढवळाढवळ, जावयाची सटकली; सासूला कायमचं संपवलं, शरीराचे १९ तुकडे करून...

Haryana: दोन गटात हाणामारी; दगडफेकीनंतर वाहनं पेटवली, अनेकजण जखमी

Vastu Tips For Money: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी, पैशांची होईल भरभराट

Ajit Pawar: राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं बारामतीचं उदाहरण, म्हणाले...

SCROLL FOR NEXT