Bhiwandi Police Saam tv
महाराष्ट्र

Bhiwandi Police : ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीचे कारनामे उघड; भिवंडीतून ३ जणांना अटक

Bhiwandi News : पोलिसांनी ताब्यात घेतलेले इसम ऑनलाइन फसवणूक करणारे असल्याची खात्री झाल्याने त्यांच्या जवळील आठ बँक खात्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार बँक खात्यांमध्ये सुमारे ३५ लाख रुपये रक्कम वर्ग झाली

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 
भिवंडी
: अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून अनेकांची ऑनलाईन फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. यामध्ये अशिक्षित व सुशिक्षित सुद्धा फसवले जात आहेत. त्यानुसार भिवंडी शहरातील शांतीनगर पोलिसांनी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीचे कारनामे उघड करण्यात आले असून यामध्ये दोन अल्पवयीन आरोपी असल्याने तिघा जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून ९ मोबाईल, १२ डेबिट कार्ड, १७ चेक बुक असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फातिमा नगर येथे काही इसम वेगवेगळ्या लोकांच्या नावाने बँक खाते उघडून ऑनलाइन फसवणूक करून त्यांचे बँक खात्यात पैसे आल्यानंतर पैसे काढून लोकांचे फसवणूक होते. याबाबत पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने फातिमानगर परिसरातून अब्दुल रब अब्दुल अहाद अन्सारी (वय २३), आतिक अहमद अन्सारी (वय २०), मोहम्मद बशर जकी उल्ला अन्सारी (वय २०) यासह दोन अल्पवयीन अशा पाच जणांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली.  

परराज्यातून बँक खात्यातील रक्कम ट्रान्सफर  

या चौकशी दरम्यान त्यांच्या कडील बँक खात्याची माहिती राष्ट्रीय सायबर अपराध रिपोर्टिंग पोर्टल तपासणी केली असता आरोपींकडून हस्तगत केलेल्या बँक खात्यात भारतातील वेगवेगळ्या शहरामधील देहेरी पोलीस स्टेशनमध्ये बिहार, तामिळनाडू कोईमतुर, तामिळनाडू, भिवडी पोलीस स्टेशनमध्ये राजस्थान, नारायणपुरा पोलीस स्टेशन अहमदाबाद, हिन्नूर पोलीस स्टेशन बेंगलोर कर्नाटक या ठिकाणाहून त्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन रक्कम ट्रान्सफर झाल्याने बँक खाते फ्रीज करण्यात आल्याची माहिती मिळाली. 

तिघांना केली अटक 

पोलिसांनी ताब्यात घेतलेले इसम ऑनलाइन फसवणूक करणारे असल्याची खात्री झाल्याने त्यांच्या जवळील आठ बँक खात्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यानुसार आरोपींच्या बँक खात्यांमध्ये सुमारे ३५ लाख रुपये रक्कम वर्ग झाली. त्यानंतर आरोपींनी ही रक्कम तत्काळ बॅक खात्यातून काढून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या पाच आरोपींविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघा जणांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याजवळील उर्वरित बँक खात्याची तपासणी करून फसवणूक केलेली रक्कम अजून वाढण्याची शक्यता असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

Chronic Kidney Symptoms: क्रॉनिक किडनी डिजीजची सुरुवात कशी होते? महिलांनी अजिबात दुर्लक्षित करु नका

Maharashtra Live News Update: सतिश उर्फ खोक्याला जामीन मंजूर

Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ; १५ गावांना सतर्कतेचा इशारा | VIDEO

Couple Romance News: धावत्या दुचाकीवर अश्लील चाळे, पुढे बसून बॉयफ्रेंडला मिठी मारली अन्...; कपलचा रोमान्स करतानाचा VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT