Bhiwandi Fire Saam tv
महाराष्ट्र

Bhiwandi Fire : भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू, २० गोदाम जाळून खाक

Bhiwandi News : भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीत भोईर कंपाऊंड या केमिकल साठवलेल्या गोदामास भीषण आग लागली होती. ही आग इतकी पसरली कि वाढत गेलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी १८ ते २० गोदामा आली

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 
भिवंडी
: भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एका केमिकल गोदामाला शनिवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली होती. यात अनेकजण अडकले होते. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास कंपनीतील एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे वळ गाव परिसरात खळबळ उडाली आहे. 

भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीत भोईर कंपाऊंड या केमिकल साठवलेल्या गोदामास भीषण आग लागली होती. ही आग इतकी पसरली कि वाढत गेलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी १८ ते २० गोदामा आली. यामध्ये कल्याण येथील सोमनाथ भोजने (वय ४८) असे मयत कामगाराचे नाव आहे. सुदैवाने या आगीत अन्य कोणी कामगार जखमी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

दरम्यान केमिकल गोदामातील ड्रमचा स्फोट होऊन ही आग पसरली होती. या आगीच्या झळा मागील व पुढील बाजू कडील गोदामांना सुद्धा लागली. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास मागील बाजूकडील गोदामातील कामगार सोमनाथ भोजने हा गोदामातील काही साहित्य घेण्यासाठी गेला असता आगीत तो अडकला. येथून बाहेर निघता न आल्याने त्याचा होरपळून मृत्यू झाला आहे. हा मृतदेह मागील बाजूकडील मोकळ्या जागेत आढळून आला. नारपोली पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला.

पहाटे चारला आग आली आटोक्यात 

भिवंडीसह कल्याण, ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई व अंबरनाथ एमआयडीसी यांच्या अग्निशामक दलाच्या पथकाने हि आग पहाटे चार वाजता आग आटोक्यात आणली. सध्या घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या आग कुलिंगचे काम करीत आहेत. तर नारपोली पोलिस घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis: मालेगाव निकालावर देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर हल्लाबोल; म्हणाले... VIDEO

Maharashtra Live News Update: - कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदलणार?

Pimpri Chinchwad Crime : ज्येष्ठ नागरिकाला बांधून बंगल्यात दरोडा; राजस्थानी दरोडेखोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बंदुकीचा धाक दाखवत महिलेवर अत्याचार, प्रायव्हेट फोटो काढून ब्लॅकमेलिंग, काळंनिळं होईपर्यंत मारलं; बीड हादरलं

श्रावणात वांगी का खाऊ नये? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT