Bhivandi Crime Saam TV
महाराष्ट्र

Bhivandi Crime : भिवंडीत नागरिकांच्या जिवाशी खेळ; एक्सपायरी डेट संपलेल्या मिठाईची दुकानात विक्री

Ruchika Jadhav

फय्याज शेख

Bhivandi Crime News :

मुदतबाह्य झालेल्या आणि खाण्यास अयोग्य असलेल्या खाद्य पदार्थांचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीत घडला आहे. दोन व्यक्तींनी एक्सपायरी डेट संपूनही खाद्यापदार्थ विक्रीसाठी ठेवून नागरिकांच्या जीवाशी खेळ केलाय. या दोघांनाही पोलसांनी आता ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, झोमॅटो कंपनीने या दोघांना सदर पदार्थांची एक्सपायरी डेट संपल्याने ते कचऱ्यात फेकण्यास किंवा नष्ट करण्यास सांगितले होते. मात्र या दोघांनी थोड्याशा पैशांसाठी नागरिकांच्या जीवशी खेळ केला. त्यांनी हे पदार्थ नष्ट न करता झोपडपट्टी विभागात विक्रीसाठी ठेवले.

झोमॅटो या कंपनीने आपल्याकडील मुदतबाह्य खाद्यपदार्थ हे नष्ट करण्यासाठी मोहम्मद अहमद मोहरम अली कुरेशी आणि असीम अक्रम अन्सारी या दोघांच्या ताब्यात दिला होता. यामध्ये मिठाई, लाडू सोन पापडी असे खाद्य पदार्थ असल्याने त्यांनी तो नष्ट न करता विक्रीसाठी स्वतःच्या ताब्यात ठेवला होता. सदर माल नष्ट करण्यासाठी कंपनीकडून दोघांना पैसेही देण्यात आले होते.

कामासाठी पैसे घेतले मात्र ते काम पूर्ण न करता या दोघांनी त्यातूनही पैसे कमवण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी सदर घटनेबाबत पोलिसांना टीप मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकून हा सर्व साठा जप्त केलाय. तसेच दोघांनाही अटक केली आहे. मुस्लिम धर्मीयांचा रमजान महिना सुरू झाल्याने शहरातील अनेक झोपडपट्टीत अशा प्रकारे खाद्यपदार्थ विक्री होऊ शकतात त्यावर पोलिस लक्ष ठेवून आहेत. शांतीनगर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : बीआरएसएसचे अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत; आज 'तुतारी' हाती घेणार

Bachchu Kadu : बच्चूभाऊंना विधानसभेच्या तोंडावर महायुतीकडून 'कडू' घास; एकमेव आमदार पळवला!

Viral News : रामाची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीला हार्ट अटॅक; मंचावरच सोडला जीव, धक्कादायक VIDEO

Pune Crime : पुणे हादरलं! वारज्यात घरात घुसून महिलेवर लैंगिक अत्याचार, शहरात संतापाची लाट

Hypertension and High Cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास? वाचा तज्ज्ञांनी काय काय सांगितलं

SCROLL FOR NEXT