Bhimashankar jyotirlinga saam tv
महाराष्ट्र

Bhimashankar jyotirlinga : महाराष्ट्रातलं 'भीमाशंकर ज्योतिर्लिंग' आसाममध्ये; CM हिमंत विश्व शर्मांच्या दाव्यानं वादाची ठिणगी

Bhimashankar jyotirlinga : आसाम पर्यटन विभागाने भीमाशंकर ज्योतिर्लिंगासंदर्भात केलेल्या जाहिरातबाजीवरून नवा वाद निर्माण झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>>रोहिदास गाडगे

Bhimashankar jyotirlinga : आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी 'भीमाशंकर ज्योतिर्लिंग' आसाममध्ये असल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही तर आसाम पर्यटन विभागाने यासंदर्भात जाहिरातबाजी देखील केली आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून महाराष्ट्राच्या खेड तालुक्यातील भिमाशंकरकडे पाहिले जाते. मात्र आता महाशिवरात्री महोत्सव तोंडावर आला असताना आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी भिमाशंकर आसाममध्ये असल्याचा दावा केला आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचा गंभीर आरोप

काँग्रेसेचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. "केवळ उद्योगच नव्हे तर आता भाजपला महाराष्ट्रातून भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचे आहे. आता भाजपच्या आसाम सरकारचा दावा आहे की भीमाशंकरचे सहावे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये आहे. या अत्यंत आगाऊपणाच्या दाव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो." असे ट्वीट सावंत यांनी केले आहे. (Latest Marathi news)

तसेच "शिंदे फडणवीस सरकारने तात्काळ भूमिका स्पष्ट करुन आसाममधील भाजप सरकारच्या या निंदनीय कृतीचा निषेध केला पाहिजे. भाजपाने केवळ महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्याच नव्हे तर तमाम भारतीयांच्या श्रद्धा, भावना दुखावल्या आहेत. भाजपाचा महाराष्ट्राबद्दलचा आकस सातत्याने दिसून येत आहे", असे देखील सावंत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

अमोल कोल्हेंची मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी

खासदार अमोल कोल्हे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. "आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी भिमाशंकरचं सहावं ज्योतिर्लिंग हे आसाममध्ये असल्याचा दावा केला आहे. मला वाटतं हा दावा दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

"भिमाशंकर मंदिराला गेल्या कित्येक शतकांपासून धार्मिक मान्यता आहे. माझी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या या भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या वक्तव्यावर वेळीच हस्तक्षेप करावा आणि जे सत्य आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवावं" अशी विनंतीही अमोल कोल्हे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT